वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारी टोळी नारायणगाव पोलीसांकडून अटक..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे : दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, व मोटार सायकलसह किं. रू. १,९०,०००/- चा मुद्देमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाईनारायणगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. २७/२०२५ भा.न्या.सं. ३०३ (२), ३(५) प्रमाणे दि. २३/०१/२०२५ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे आनंदाबाई दशरथ खिलारी वय ६५ वर्षे रा. शिरोली तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे या दि. २३/०१/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा. सु॥ स घराजवळील शेतीत काम करणेसाठी गेल्या होत्या, पुन्हा माघारी १४/३० वा घरी आल्या तेव्हा त्यांचे घरालगतच्या पत्रा शेडमधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या व खुंटीला अडकवलेली पिशवीसह पिशवीतील सोन्याचे वजनाचे दागिने किं. रू. २,९६,०००/- चे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले होते. त्याबाबत त्यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.सदरची घटना भरदिवसा अगदी दिड तासांचे आत झालेली होती, यामध्ये वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरी गेलेले असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, आसपासचे परिसरात साक्षीदारांकडे तपास करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे स्था.गु.शा. चे पथकाने तपास सुरू करून घटनास्थळ हे ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दरम्यान एक संशयित मोटार सायकल गेल्याचे आढळून आली. त्याच प्रमाणे आसपासचे लोकांकडे चौकशी केली असता, सदरची संशयित मोटार सायकल ही घटनेच्या वेळी फिर्यादीचे घराचे दिशेने जावून पुन्हा माघारी आली असल्याची माहिती मिळाली. सदर संशयित मोटार सायकलचा व त्यावरील तिघांचा शोध घेत असताना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरची मोटार सायकल ही इसम नामे भिमाजी साहेबराव गाडगे रा. कळस, गाडगेमळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर हा वापरत असून त्यानेच त्याचे साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. त्या अनुषंगाने स्था.गु.शा.चे पथकाने संशयिताचा शोध सुरू केला असता, दि. २५/०१/२०२५ रोजी सदरचा संशईत इसम हा त्याचेकडील मोटार सायकलसह बेल्हे गावात असून त्याचे सोबत त्याचे साथीदार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले असून त्यांनी त्यांची नावे १) भिमाजी साहेबराव गाडगे वय ३५ वर्षे, २) बाबाजी काशिनाथ येवले वय ३६ वर्षे, ३) तुषार भाऊसाहेब शिरोळे वय १८ वर्षे, तिघे रा. गाडगेमळा, कळस ता. पारनेर, जि. अहिल्यानगर अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडून तपासादरम्यान गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल, सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र, दोन सोन्याच्या नथ असा मुद्देमाल किं.रू. १,९०,०००/- चा हस्तगत करणेत आलेला असून आरोपींनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले असून ते दागिने कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करणेत येणार आहेत.यातील फिर्यादी महिला या वयोवृद्ध होत्या, चोरीचे घटनेत त्यांचे व त्यांचे मुलीने ठेवायला दिलेले सोन्याचे दागिने चोरी गेले होते, विवाहीत मुलीचे दागिने चोरी गेल्याने फिर्यादी महिला या अतिशय त्रस्त झालेल्या होत्या, मुलीस सासरी त्रास होईल याची काळजी त्यांना वाटू लागली होती, खुप आशा बाळगून त्यांनी पोलीसांना त्यांची व्यथा सांगितली होती. सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने वयोवृद्ध महिला फिर्यादी ह्या अतिशय आनंदीत झाल्याने त्यांनी स्था.गु.शा.चे पथकाचे आभार मानून कौतुक केले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रविंद्र चौधर, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोस्टे चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे यांनी केली असून आरोपीस मा. न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असून पुढील तपास नारायणगाव पो स्टे चे पोहवा एस.एम. कोकणे व स्था.गु.शा. चे वतीने करणेत येत आहे.