वयोवृद्ध इसमांची ए.टी.एम. मधून पैसे काढताना हातचलाखी करून फसवणूक करणारा रेकॉर्डवरील आरोपी स्था. गुन्हे शाखेकडून जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
सांगली ;पोलीस स्टेशनतासगावअपराध क्र आणि कलम११८/२०२५ बी.एन.एस. कलम ३१८ (४)फिर्यादी नावदिलीप मारूती देवमाने, रा विसापूर, ता तासगावगु.घ.ता वेळगु.दा.ता वेळमाहिती कशी प्राप्त झालीदि. १९/०२/२०२५ रोजीचे १४.००वा. चे सुमारास तासगाव येथील काशीपुरा गल्ली येथील१२/०३/२०२५ रोजीपोह/सागर लवटे1एस.बी.आय बँकेचे ATM मध्येकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखालीपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगलीसहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगलीपोहेकों / सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, अमर नरळे, द-याप्पा बंडगर, नागेश खरात पोना/ संदिप नलावडे, उदय माळी, पोशि विक्रम खोत, केरूबा चव्हाण पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणेअटक दिनांक दि.१३/०३/२०२५ रोजीआरोपीचे नाव व पत्तारेकॉर्डवरील आरोपी अमोल भगवान शेंडे, वय ३५ वर्षे, रा यादव वस्ती, काठी, ता इंदापूर, जि पुणे.उघडकीस आलेले गुन्हे१) तासगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ११८/२०२५ बी.एन.एस. कलम ३१८ (४)२) वडूज (सातारा) पोलीस ठाणे गु.र.नं. ३९६/२०२४ बी.एन.एस. कलम ३१८ (४)जप्त मुद्देमाल१) २४,५००/- रू. रोख रक्कम२) ५०,०००/-रू. एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल जु. वा. किं. अं.७४,५००/-रू. एकूणगुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस फसवणूकीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, फसवणूकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन फसवणूक करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह/सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे, रा काठी, ता इंदापूर, जि पुणे याने काही दिवसापूर्वी तासगाव येथील ए.टी.एम. मध्ये हातचलाखी करून ए.टी.एम. बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंतनगर चौकात विना नंबर प्लेट मोटार सायकलीवरून फिरत आहे.नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे यशवंतनगर चौकात जावून सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलजवळ थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल भगवान शेंडे, वय ३५ वर्षे, रा यादव वस्ती, काठी, ता इंदापूर, जि पुणे असे सांगितले, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली. त्यास सदर रक्कमेबाबत विचारणा केली असता, त्याने तासगाव मधून SBI बँकेच्या ए.टी.एम. मध्ये पैसे काढणेकरीता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून ए.टी.एम. कार्ड बदलून सदर ए.टी.एम. कार्डमधून तासगाव येथील IDBI बँकेच्या ए.टी.एम. मधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले. तसेच सातारा जिल्हयातील मायणी गावातील वयस्कर इसमास ए.टी.एम. अदलाबदली करून फसणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली.सदर बाबत तासगाव व वडूज (सातारा) पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरचा माल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणेस फसवणूक, आर्म अॅक्ट व खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच नातेपुते (सोलापूर) पोलीस ठाणे गु.र.नं. २९/२०२३ भा.दं.सं. कलम ४२० या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी आहे.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.