वाहनचोराकडून बजाज पल्सर, टीव्हीएस वेगो, यामाहा आरएक्स १००, होंडा डिओ, अॅक्सेस होंडा स्प्लेंडर प्लस, केटीएम डयुक अशा एकूण १० मोटार सायकल व चोरीचे ७ मोबाईल व १ इलेक्ट्रिक सायकल खडक पोलीसांना केली जप्त..

पुणे
सह संपादक – रणजित मस्के
सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेतेबाबत सूचना दिल्या आहेत. खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार लोंढे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. अनिल सुरवसे, प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोहवा २८४२ दुडम, पोहवा ९१५ ठवरे, पो.शि. ४४३० गोरे, पोशि ९१०२ वाबळे, पो.शि. ४९९४ गायकवाड, पो.शि. ४४०२ चंदेल, पो.शि. ३६७९ केदारी असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार किरण ठवरे, पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे, पोलीस अंमलदार विश्वजित गोरे, पोलीस अंमलदार शुभम केदारी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८६/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) मधील मोटार सायकल चोरणारा एक संशयित इसम हा १० नं कॉलनी काशेवाडी भवानी पेठ पुणे येथे असुन सदरचा इसम हा अंगाने मजबुत बांधा, रंगाने सावळा, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळी जिन्स पॅन्ट, केस वाढलेला, असे कपडे परिधान केलेले आहे” अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदरची बातमी लागलीच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदरच्या इसमास ताब्यात घेणेबाबत भौखीक आदेश दिल्याने लागलीच आम्ही स्वतः व तपास पथकातील वरील नमुद पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जावुन प्राप्त वर्णनाप्रमाणे इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता मुनावर इम्तियास शेख, वय १८ वर्षे, धंदा मजुरी, रा. १० नं. कॉलनी काशेवाडी भवानी पेठ पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याचेसोबत इतर ०५ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. आम्ही त्यांना विश्वासात घेवुन अधिकची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, भवानी माता मंदिरासमोर, भवानी पेठ येथून चोरली असल्याची कबुली दिल्याने त्यातील मुनावर इम्तियास शेख, वय १८ वर्षे, धंदा मजुरी, रा. १० नं. कॉलनी काशेवाडी भवानी पेठ पुणे यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री अनिल सुरवसे सहा. पोलीस निरीक्षक व श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक यांनी तपास पथकाचे सहाय्याने अधिक तपास करता अटक आरोपी व विधीसंघर्षित बालकांकडून चोरीच्या २.३९,९००/-रुपये किंमतीच्या १० मोटारसायकल जप्त केल्या आहे. सध्या खडक पो.स्टे. चे ०५ गुन्हे व लष्कर पोलीस ठाणे ०१, विश्रामबाग पोलीस ठाणे ०१, समर्थ पोलीस ठाणे ०१, कोरेगाव पोलीस ठाणे ०१, येथील गुन्हे उघडकीस आणून इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांचेकडून चोरी केलेले ०७ मोबाईल व ०१ सायकल सुध्दा जप्त करण्यात आले असून त्याचा तपास सुरु आहे.
अ.क्र. पोलीस ठाणे
गुन्हा रजि. नं.
वाहन प्रकार/मोबाईल
किंमत
०१
खड़क
| १८६/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)
सुझुकी एक्सेस
४०,०००/-
०२
खडक
५२/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)
टि व्ही एस विगो
१२,०००/-
०३
खडक
१९०/२०२५ बी.एन.एस.
एक रेडमी कंपनीचा ए-३
५,२००/-
Scanned with OKEN Scanner
३०४,३(५)
मोबाईल
०४
खडक
Nc.no. ३९६/२५ बी.एन.एस.
यामाहा Rx १००
४,०००/-
३०३(२)
०५
खडक
Nc.no. ११५/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)
इलेक्ट्रिक सायकल
४,५००/-
०६
लष्कर
४१/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) ७४/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२)
बजाज प्लसर 120
०७
विश्रामबाग
२०,०००/-
बजाज प्लसर NS २२०
०८
समर्थ
४०,०००/-
Nc.no. ३९६/२५ बी.एन.एस.
यामाहा Rx १००
४,२००/-
३०३(२)
०९
कोरेगाव पार्क
२८/२०२५ बी.एन.एस.
बजाज प्लसर २२०
४०,०००/-
३०३(२)
१०
तपास सुरू
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस
१०,०००/-
११
तपास सुरू
बजाज प्लसर १८०
२०,०००/-
१२
तपास सुरू
केटीएम १२५ उयूक
४०,०००/-
एकूण किंमत रूपये
२.३९,९००/-
नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सहआयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती अनुजा देशमाने, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पो.निरी. श्री. अनिल सुरवसे, पो.उप-निरी. श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजीत गोरे, योगेश चंदेल, शुभम केदारी, मयूर काळे, शोएब शेख, यांचे पथकाने केली आहे.