वाहनांची तोडफोड करुन दशहत माजविणा-या अनोळखी आरोपीतांना गुन्हे शाखा युनिट ५ ने केले जेरबंद

दि.१६/०४/२०२५ रोजी पहाटेच्या वेळी अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येवुन अश्रफनगर कोंढवा बुा. पुणे येथे दहशत माजवत ०९ चारचाकी वाहनांची तोडफोड करुन नुकसान केलेले होते. तसेच त्याच टोळक्याने लक्ष्मीनगर कोंढवा बुा पुणे येथे देखील दुचाकी, रिक्षा व कार या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३२४ व भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३.७ या कलमान्वये गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व तो अनोळखी आरोपींनी केला असल्याने वरिष्ठांनी गुन्हे शाखेस समांतर तपास करुन आरोपी निष्पन्न करुन त्यांना तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेशीत केलेले होते.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०५ कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्हयामधील अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना सहा. पोलीस फौजदार राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना बातमी मिळाली की, दाखल गुन्हा हा आरोपी नामे नवाज शेख, अल्फाज बागवान, यश सारडा व अमन इनामदार यांनी व त्यांचे सोबत असलेल्या ०४ ते ०५ अनोळखी इसमांनी केला असुन ते डायस प्लॉट गुलटेकडी येथील रहिवाशी आहेत. अशी खात्री माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे. १) नवाज अजीज शेख, वय. २० वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे. २) अल्फाज मुर्तजा वागवान, वय. २० वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे. ३) यश विजय सारडा, वय. १९ वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे. ४) अमन कबीर इनामदार वय. २० वर्षे, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे. यांना गुलटेकडी परिसरातुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे उपास करता त्यांनी व त्यांचे इतर साथिदार यांचेसह दाखल गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपींना पुढील कार्यवाही कामी कोंढवा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण अति. कार्यभार युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर व पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजयकुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे व स्वाती तुपे यांचे पथकाने केली आहे.