शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर व इचलकरंजी येथे दुचाकी वाहनाचा मुळ सायलेंसर ऐवजी डुप्लीकेट सायलेंसरचा वापर करणारे वाहनधारकांवर वाहतूक शाखेकरवी विशेष कारवाईची मोहीम..

उपसंपादक-रणजित मस्के
कोल्हापूर ;
एकुण ७३७ कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर नाश…!
कोल्हापूर शहरात आपले खाजगी दुचाकी वाहनांचे मुळ कंपनीचे सायलेंसर बदलुन त्या ऐवजी कर्णकर्कश आवाजाचे डुप्लीकेट सायलेंसर बसविण्याचे प्रकारात वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक सोो, अपर पोलीस अधीक्षक सो व उपविभागीय पोलीस अधिकारीसाो, शहर विभाग यांचे मार्गदर्शना नुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर व इचलकरंजी यांचे वतीने जे वाहनधारक आपले दुचाकी वाहनावर डुप्लीकेट अशा प्रकारे वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांविरुध्द विशेष व्यापक मोहीम राबवुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत दिले आदेशान्वये, वाहनावर लोगो वापरुन मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवरील कारवाई दरम्यान सन २०२४ मध्ये शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूर कडुन १२३५ दुचाकी वाहनधारकावर कारवाई करुन १२,३३,०००/- रु.चा दंड आकारण्यात आलेला आहे.
तसेच इचलकरंजी वाहतुक शाखेकडुन ३६ दुचाकी वाहनधारकावर कारवाई करण्यात आली आहे. डुप्लीकेट सायलेंसरचा पुर्नवापर होवु नये या करीता वाहतुक शाखा कोल्हापूर कडुन ताब्यात घेतलेले ७०१ सायलेंसर व वाहतुक शाखा इचलकरंजी कडील ३६ असे एकुण ७३७ सायलेंसर आज रोजी नाश करणेत आले ओहत.


तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूरचे वतीने सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, वाहनांचे मुळ सायलेंसर संदर्भाने नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर तसेच असे सायलेंसर विक्री करणारे विक्रेते, सायलेंसर बसविणारे मॅकॅनिकल तसेच सबंधीत शोरुम मालक यांचे विरुध्द कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी त्यांचे दुचाकी वाहनांचे सायलेंसर बदलु नयेत व होणारी कायदेशीर कारवाई टाळावी.
सदरची कारवाई शहर वाहतुक शाखेकडील प्रभारी अधिकारी पोनि नंदकुमार मोरे यांचे निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.