वि.सी.गुर्जर ज्यूनि.कॉलेज कशेळी मार्फत हर घर संविधान अंतर्गत व्याख्यानं माळेचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी-सुशिल तांबे
कशेळी : राजापूर राजापूर तालुक्यातील कशेळी येथीलबवि.सी.गुर्जर ज्यूनि.कॉलेज मध्ये हर घर संविधान अंतर्गत संविधानावर व्याख्यान आणि दुस-या भागात अंमली पदार्थ प्रतिबंध या विषयावर व्याख्यानमाला कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.यामध्ये संविधान विषयक व्याख्यान PPT च्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत प्रा.मदनेसर यांनी दिले व.दुस-या भागात अंमली पदार्थ प्रतिबंध विषयक व्याख्यान प्रा.दातार सर यांनी दिले.या कार्यक्रमाला कशेळी गावातील सर्व शाळांचे इयत्ता ६ वी व इयत्ता ७ विचे विद्यार्थी,काॅलेजचे विद्यार्थी, शिक्षक, संस्था अध्यक्ष श्री वसंत पाटील,उपाध्यक्ष श्री.पद्माकर कशाळकर ,प्राचार्य श्री.मंगेश लाड, केंद्र प्रमुख श्री.सुनिल जायदे, केंद्र मुख्याध्यापक श्री.मनोज मिरगुले, पदवीधर शिक्षक श्री.दिपक फणसे, प्राध्यापक श्री.तुषार फोडकर,इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काॅलेजच्या प्राध्यापिका सौ.रानडे मॅडम यांनी केले.. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला..