वसईत नवनिर्वाचित नोटरी वकिलांची प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी – सुनील पालकर
वसई




दिनांक 31-07-2025 रोजी वसई तालुक्यात नव निर्वाचित नोटरी वकिलांसाठी एक दिवसीय नोटरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदरच्या कार्यक्रमासाठी
१)डॉ. श्री. रणजीत परेरा
२) अँड. नितीन शहा
३) अँड. नयन जैन
४) अँड. हरीश शहा
५) अँड. श्री. अजय मिश्रा
६) अँड. सौ. अर्चना जैन
इत्यादी वक्ते लाभले ह्या वक्त्यांनी त्यांच्या रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या कामातून वेळ काढत आपलं अमूल्य असे मार्गदर्शन नोटरी वकिलांना केले.
सदरच्या कार्यक्रमात वसई तालुक्यातील जिल्हा न्यायाधीश श्री जगदाळे साहेब ह्यांनी विशेष उपस्थिती लावली. जगदाळे साहेबांच्या हस्ते सदर कार्यक्रमात अँड. सौ. पूनम पाटील जाधव ह्यांना फ्रेम भेट करण्यात आली.
सदर कार्यक्रम हा दोन सदरात चालला सकाळचे सदर १२.३० ते २.०० पर्यंत होते नंतर चे सदर ३.०० ते ४.३० पर्यंत होते.
५० पेक्षा अधिक नोटरी वकिलांनी सदर प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेतला, सदर नवनिर्वाचित नोटरी वकिलांना प्रशिक्षणात नोट्स चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी वसई तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड. श्री पी एन ओझा आणि उपाध्यक्ष श्रीमती साधना धुरी ह्यांनी आवर्जून हजेरी लावली.
सदर कार्यक्रमासाठी अँड. श्री. पी एन ओझा ह्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
अँड. आनंद घरत आणि
अँड पूनम जाधव पाटील ह्यांनी केले.