वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या धरणाचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने पाणी बंद रहाणयाबाबत विशेष सुचना..

प्रतिनिधि -मांगीलाल सुथार
पालघर

वसई विरार शहर महानगर पालिकेस सूर्या धरणाच्या महापालिकेच्या योजनेतून 200 mld आणि MMRDA च्या सूर्या धरणाच्या योजनेतून 140 mld पाणी पुरवठा रोजचा होत असतो,दिनांक 25/03/2025 रोजी संध्याकाळी 06:00 pm वाजता MMRDA च्या योजनेचा कवडसा पंपिंग स्टेशन येथील mseb चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला त्यामुळे शहरातील MMRDA च्या योजनेचा पाणी पुरवठा पूर्ण पण बंद झाला,दिनांक 30/03/2025 रोजी संध्याकाळी 06:00 pm वाजता तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करून कवडसा पंपिंग स्टेशन येथील mseb चा विद्युत सप्लाय पूर्ववत होऊन शहरात त्याच दिवशी रात्री MMRDA चा पाणी पुरवठा सुरू झाला त्यानंतर शहरातील पाणी पुरवठा टप्याटप्याने सुरळीत करण्यात येत होता ,त्या नंतर काल दिनांक 31/03/2025 सोमवारी रोजी संध्याकाळी 06:00 pm वाजता MMRDA च्या योजनेचा कवडसा पंपिंग स्टेशन येथील mseb चा ट्रान्सफॉर्मर पुन्हा नादुरुस्त झाला असून MMRDA च्या योजनेचा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद झाला आहे,
त्यामुळे दिनांक 31/03/2025 सोमवार रोजी संध्याकाळ 06:00 pm पासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित कमी दाबाने व कमी प्रमाणात होत आहे
तरी MMRDA च्या योजनेचा mseb चा ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती होऊन विद्यूत पुरवठा सुरळीत चालू होऊन (पुढील 2/3 दिवस)पाणी पुरवठा सुरळीत होई पर्यंत शहरात होणारा महापालिकेच्या सूर्या योजनेचा पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यासाठी महापालिके तर्फे खलील प्रमाणे तात्पुरती उपाय योजना करण्यात येत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी ही विनंती
तात्पुरती उपाय योजना म्हणून महापालिकेचे पाणी पुरवठा झोन बंद राहतील👇
1)दिनांक 01/04/2025 मंगळवार रोजी रात्री 10:00 pm ते दिनांक 02/04/2025 बुधवार रात्री 10:00 pm पर्यंत विरार ईस्ट आणि विरार वेस्ट या झोन मधील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
2)दिनांक 02/04/2025 बुधवार रात्री 10:00 pm ते दिनांक 03/04/2025 गुरुवार रात्री 10:00 pm पर्यंत नालासोपारा ईस्ट ,नालासोपारा वेस्ट आणि पेल्हार धानिव या झोन मधील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
3)दिनांक 03/04/2025 गुरुवार रात्री 10:00 pm ते दिनांक 04/04/2025 शुक्रवार रात्री 10:00 pm पर्यंत नवघर मणिकपूर ,वसई गाव,वसई ईस्ट ,वेस्ट पूर्ण,नायगाव वेस्ट आणि नायगाव जुचंद्र ईस्ट या झोन मधील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
वरील उपाय योजना MMRDA चा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईस्तोवर वरीलप्रमाणे झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येईल.
तरी नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी ही विनंती
पाणी पुरवठा विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका