वसई तालुका बार असोसिएशन च्या कार्यालयात मोफत संपूर्ण बॉडी चेक अप च्या कॅम्प चे यशस्वी आयोजन..

प्रतिनिधी-सुनिल पालकर
वसई :
Unicare health care आणि वसई तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25/04/2025 रोजी वसई तालुका बार असोसिएशन च्या कार्यालयात “संपूर्ण बॉडी चेक अप ” च्या कॅम्प चे मोफत आयोजन करण्यात आलेले होते. सदर कॅम्प मध्ये डॉ. सदाशिव ओऊळकर व डॉ.रमेश कांबळे ह्यांनी आयुर्वेदिक उपचार केले. सदर कॅम्प साठी वसई तालुक्यातील १०० हून अधिक वकिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे वसई न्यायालयातील सर्व सरकारी वकिलांनी ह्या कॅम्प ला हजेरी लावली सरकारी वकील श्री भूपेश पुरंदरे, अँड.सौ. चौगुले , अँड. सौ. प्रज्ञा चांदणे वगैरे हजर होते.





त्याचप्रमाणे अँड.सौ. जोस्ना वर्तक , सौ. संजीवनी राणे हे हजर होते.
सदर कार्यक्रमासाठी वसईतील ज्येष्ठ वकील श्री. अविनाश विद्वांस सर, अँड. श्री. एम. के तिवारी सर, अँड श्री. जी. डी. घरत सर हे हजर होते, वसई तालुका बार असोसिएशन च्या उपाध्यक्षा अँड. साधना धुरी ह्या हजर होत्या, अँड.भरत पाटील,अँड. अजय मिश्रा, अँड. युवराज शुक्ला हे हजर होते.
सदर कार्यक्रमासाठी वसई तालुका बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड. श्री पी. एन. ओझा ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
अँड. श्री मनोज तिवारी ह्यांनी सहकार्य केले
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
अँड. श्री. आनंद घरत
आणि अँड. पूनम जाधव पाटील ह्यांनी केले.