वसई माणिकपूर येेथे वाहन चोरी करणा-या चोरटयाला अटक करुन ५ गुन्हयांची उकल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण धडक शाखेची कारवाई…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

माणिकपूर:

      माणिकपूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील फिर्यादी श्री अभय महेन्द्र राजभर, वय २२ वर्षे व्यवसाय- सुगी डिलीव्हरी, रा. रुमनं ३, रॉकी चाळ, गवनीघर, नौपाडा, माणिकपुर, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर यांनी त्याचे मालकीची ७०,०००/- रुपये किंमतीची टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर मोटार सायकल क्रमांक MH 48 CD 9208 ही दिनांक ०४/०८/२०२३ रोजी सकाळी १२.०० वा ते १२.०६ चे दरम्यान नौर्थ लेन, हनुमान मंदिराच्या जवळ, शास्त्रीनगर, वसई येथे पार्क केली असता ती अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २९७ / २०२३ भा.द.वि.क ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

     मिरा-भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहन चोरी होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांना प्रतिबंध करणाच्या अनुषंगाने व दाखल गुन्हयांची उकल करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वर नमुद दाखल वाहन चोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत होती.

     त्याअनुषंगाने सपोनि. दत्तात्रय सरक व स्टाफ असे घटनास्थळ व घटनास्थळाचे आजुबाजुच्या सी.सी.टी.व्ही कॅमेरे फुटेजची तपासणी तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी निष्पन करुन नालासोपारा पुर्व, बिलालपाडा, ओम साई नगर येथे दिनांक ११/०८/२०२३ रोजी सापळा रचुन इसम नामे नंदकिशोर उर्फ राहुल अशोक सिंग, वय २२ वर्ष, राह रुम नं ३, बी विंग, गणेश वेलफेअर सोसायटी, हनुमान मंदीराच्या जवळ, बिलालपाडा, नालासोपारा पूर्व यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने चोरी केलेल्या दोन मोटर सायकल व तीन ऑटो रिक्षा असा एकूण ३,3०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल त्याचेकडुन जप्त करण्यात आला आहे. मिरा भाईंदर, वसई - विरार पोलीस आयुक्तालयातील खालीलप्रमाणे एकुण ५ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


   -- उघडकीस आलेले गुन्हे--

पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर
१ . माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २९७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९

  1. नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं १३० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
  2. तुळींज पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ५११ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
    ४. पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ६६४ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
    ५. नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २२९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९

सदरची कारवाई श्री. अविनाश आंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) व श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो. नि. राहुल राख, सपोनि दत्तात्रय सरक, सपोउनि श्रीमंत जेधे, पो. हवा. गोविंद केन्द्रे, शिवाजी पाटील, राजाराम काळे, सतिश जगताप, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, मसुब जवान सचिन चौधरी यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट