वर्तकनगर पोलीसानी ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरात सराईत सोनसाखळी चोरी करणा-या ईराणी गुन्हेगारास शिताफीने आवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी-विश्रवनाथ शेनोय
ठाणे



फिर्यादी श्रीमती वंदना प्रकाश माने, वय-५६ वर्ष, धंदा-गृहिणी रा.श्री गणेश अपार्टमेंट, बी/२०४, यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रीयलच्या जवळ, ठाणे पश्चिम हया दिनांक १२/०३/२०२५ रोजी पतिसोबत सकाळी ०६.०० वा. चे सुमारास यशोधननगर येथील भारत सहकारी बँकेच्या जवळ तमन्ना बिल्डींगच्या पासुन आई माता चौक च्या दिशेने मॉर्निंग वॉकला जात असताना अनोळखी चोरटयांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरी चोरी करीत असताना त्यास फिर्यादी यांनी आरोपीत याचा हात धरून विरोध करीत असताना आरोपीत याने फिर्यादी यांना ढकलुन खाली पाडले व जबरीने चैन खेचुन मोटारसायकलवर वर्तकनगर नाक्याच्या दिशेने आरोपी व त्याचा साथीदार पळून गेले. म्हणून दिनांक १२/०३/२०२५ रोजी वर्तकनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र. । २२९/२०२५ भा.न्या.सं कलम ३०४ (२), ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा. वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणेबाबत सक्त आदेश दिल्याने गुन्हयाच्या तापासाबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे यांनी वर्तकनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल जे चिंतामण, व प्रकटीकरण पथक यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सक्त सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचे तपासात तात्काळ यातील फिर्यादी यांचेकडे कौशल्याने विचारपुस करून यातील आरोपीच्या वर्णनाबाबत माहिती प्राप्त करून लागलीच सदर घटनास्थळाचे, परीसरात तांत्रीक माहितीने बारकाईने तपास करून आरोपी चितळसर, कापुरबावडी, खारेगाव टोलनाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून योग्यप्रकारे सापळा रखुन त्यास पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपीतास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुंन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सदर आरोपीत नामे १) जाफर युसुफ जाफरी, उर्फ चव्हान, वय २६ वर्षे, राह. इंदिरा नगर मस्जीद जवळ, आंबिवली वेस्ट, कल्याण, ठाणे, व २) संदिप गीरीषचंद्र प्रसाद, वय २०वर्षे, राह. ३६८/आर.बी. सिंह चाळ, कामगार नगर, अटाली, आंबिवली वेस्ट, कल्याण, ठाणे यांना सदर गुन्हयात अटक करून तपासादरम्यान त्याचेकडुन सदर गुन्हयातील तसेच इतर गुन्हयातील जबरी चोरी केलेला एकुण ३,९०,२४०/- रू किमतीचा ६ तोळे, ४ ग्रॅम, ७४ मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैन व मंगळसुत्र हस्तगत केले तसेच १,२०,०००/- किंमतीचे दोन मोटारसायकल व १५०००/- किंमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करून असे चोरीतील एकुण ५,२५,२४०/-किंमतीचे मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिल्याने तपासादरम्यान वर्तकनगर, चितळसर, कळवा, नवघर व खडकपाडा पोलीस ठाणे येथे जबरी चोरीच ७ गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. तसेच सदर अटक आरोपीने वरील गुन्हयाबरोबरच इतर ०८ गुन्हयांची देखील कबुली दिली आहे. जबरी चोरीचे १४ व शरिराविरुध्दचा ०१ असे एकुण १५ गुन्हे उघडकीस आणण्यात वर्तकनगर पोलीसांना यश आले आहे.
सदर उल्लेखनिय श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, वागळे, श्री. मंदार जावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार वाघचवरे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मल्हारी कोकरे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. विठठल चिंतामण, पोहवा / ३२१४ जाधव, पोहवा/६६७५ राठोड, ५२६पोना/७०५० पाटोळे, पोशि/३००६ सौदागरे, पोशि/८१३४ नागरे, पोशि/५३८४ कात्राबाद, पोशि/४९४१ पवार, पोशि/१८५७ काळे, पोशि/१४२४ साबळे व पोशि/५२६० राठोड यांनी केली आहे.