वणव्यामुळे महाड नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला लागली भीषण आग…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाला शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आग लागण्याची घटना घडली आहे.

याबाबत मुख्याधिकारी श्री महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजूबाजूला लागलेला वणवा वाऱ्याने पसरत आल्यामुळे प्रकल्पातील सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचे सांगितले.
या आगीमध्ये प्रकल्पातील बिलिंग आणि स्क्रिमिंग मशीनचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

आगीची माहिती मिळताच महाड अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

यावेळी महाड अग्निशमन दलातर्फे गोविंद साळुंखे, गणेश पाटील, शेखर भोसले, श्रीकांत साळुंखे, पवन कर्जावकर, अनिकेत तांबडे, विशाल केदारे यांनी तत्परता दाखवून आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com