वांद्रे पूर्व संत ज्ञानेश्वर नगर येथे SRA झोपडपट्टी गणनेला शिवसेनेचा भक्कम पाठिंबा…!

प्रतिनिधी- प्रणय जाधव
वांद्रे(पुर्व) : सोमवार दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी विभागातील रहिवाशांमध्ये SRA झोपडपट्टी गणनेबाबत संभ्रम व एक प्रकारची भीती निर्माण झाली होती त्यानिमित्ताने शिवसेना शाखा क्रं.९२ यांनी सर्व रहीवासी कमीटींची एक बैठक आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये शिवसेने तर्फे रहिवाशांना असे आश्वासन देण्यात आले की शिवसेना सदैव नागरिकांच्या पाठीशी भक्कम उभी असुन SRA च्या झोपडपट्टी गणनेला कोणीही घाबरुन जाऊ नये असे आव्हानही करण्यात आले.

सदर बैठकीमध्ये SRA चे सर्वेक्षण अधिकारी श्री. मयुर कांबळे ,शिवसेना उपविभागप्रमुख श्री .शशिकांत येलमकर, शिवसेना शाखा प्रमुख श्री. रामचरण चंदेलिया , महीला शाखासंघटक आजिजा पटेल ,शिवसैनिक दिपक खानोलकर, सदाशिव कदम, इकबाल शेख, सत्यनारायण व सर्व शिवसैनिक व संत ज्ञानेश्वर नगरचे सर्व कमेटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com