गहाळ झालेले मोबाईल फोन विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांनी नागरिकांना केले परत …

प्रतिनिधी- अक्षय कांबळे
विरार:
गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करुन एकुण ०१,८४,०००/- रुपये किंमतीचे १९ मोबाईल फोन नागरिकांना विरार पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने परत करून अति उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
विरार पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसींग मधील चालु वर्षात रहिवाशी यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. मा. वरिष्ठांनी प्रॉपर्टी मिसींग मधील मोबाईल फोनचा शोध तपास करणेबाबत दिलेल्या आदेशान्वये गुन्हे प्रकटी करण पथकाने प्रॉपर्टी मिसींगचा तपास हाती घेतला होता.
विरार पोलीस ठाणे दाखल प्रॉपर्टी मिसींग मधील गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तांत्रीक विश्लेषण करुन भारत देशातील वेगवेगळया राज्यांमधुन तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळया जिल्हयामधुन गहाळ झालेले ०१,८४,०००/- रु. किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकुण १९ मोबाईल फोनचा शोध लाऊन ते प्राप्त करण्यास यश प्राप्त झालेले आहे.

दिनांक १५.०८.२०२३ रोजी स्वातंत्र दिनाचे औचीत्य साधुन विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध लावलेले मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ३, श्री. सुहास बावचे तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग श्री. रामचंद्र देखमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, श्री. दिलीप राख, स. पो. नि. ज्ञानेश फडतरे, पो. हवा. सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, विशाल लोहार, योगेश नागरे, पो. अं. मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com