मुंबईतील वाकोला पोलीसानी भारतात अवैद्यरित्या वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन ड्रग्ज विक्री टोळीस ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:-वाकोला पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक :- 44/2024 कलम 8 (क ) 21(ब),29 NDPS act r/w Passport act 3,6(3)(1) r/w Foreign Person Act Sec 14
वाकोला पोलिस ठाणे, मुंबई या ठिकाणी दिनांक:- 10/01/24 रोजी वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करून नमूद गुन्हयातील अटक आरोपी नामे अँथोनी मादुका न्वायझे वय 32 वर्षे, राठी-ईनुगु , देश-नायजेरिया राठी-नागरी स्टोअर गल्ली, कदमवाडी, सांताक्रुझ पुर्व, मुंबई याचे ताब्यातून 55 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले होते.
तरी नमूद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये विविध तपास पथके तयार करून पुढील तपास चालू असताना नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी याची साथीदार असलेली महिला आरोपी नामे सोनिया देवी आगाऊ साईराम ,वय 22 वर्ष , रा.ठी.वाल्मिकी मंदिरामागे , कदमवाडी, वाकोला, सांताक्रुझ, पूर्व, मुंबई हीस दिनांक 14/01/ 24 रोजी ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता तिचा नमूद गुन्ह्यात सहभाग दिसून आल्याने अटक करण्यात आली आहे.
तसेच नमूद गुह्यातील मुख्य आरोपी याच्याकडून प्राप्त मोबाईलच्या आधारे तांत्रिक तपास केला असता नमूद मुख्य आरोपी हा गोरेगाव ,आरे परिसरामध्ये एका सोसायटी मध्ये इतर नाजेरियन व्यक्तीना वारंवार भेटत असल्याची माहिती मिळाली वरून नमूद ठिकाणी जाऊन पोलिस पथकाने मुख्य आरोपी सोबत ड्रग व्यवहारात सामील असलेले इतर दोन नायजेरियन आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस घेऊन आल्यानंतर सदरचे ताब्यात घेतलेले आरोपी हे मुख्य आरोपी सोबत ड्रग विक्री व्यवहारामध्ये सहभागी असल्याचे दिसून आल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:-
1) अंथोनी माधुका न्वायझे, वय -32 वर्षे, रा. ईनुगु, देश – नायझेरियन , भारतातील सद्याचा पत्ता:- वाल्मिकी मंदिराच्या पाठीमागे, कदमवाडी, कलिना, सांताक्रुझ, पूर्व, मुंबई.
2) सोनियादेवी अगाऊ साईराम, वय 22 वर्षे, रा.वाल्मिकी मंदिराच्या पाठीमागे, कदमवाडी, कलिना, सांताक्रुझ, पूर्व, मुंबई.
3) अजाह ओगबोना गोडविन उर्फ अका मोरेन , वय 33 वर्षे , रा. ईनुगु, देश – नायझेरियन , भारतातील सद्याचा पत्ता:- रॉयल पालम, मिल्क कॉलनी, गोरेगाव, मुंबई.
4) सेबी राऊल उर्फ इकेन्ना गॉडविन, वय 27वर्षे, रा. गोहिताफला, देश – आयव्हारियन कोस्ट, भारतातील सद्याचा पत्ता:- रॉयल पालम, मिल्क कॉलनी, गोरेगाव, मुंबई.
जप्त मुद्देमालाची एकून किंमत अंदाजे 56,24,500/-₹ रुपये
तपास पथक-
पो. नि. दिनेश दहातोंडे
पो.उ.नि.अरुण बंडगर व
दहशतवाद विरोधी पथकाचे पो.शि अमरनाथ दबडे,पो.शि निलेश महाले,पो.शि राहुल.पाटील

सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 08, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकोला विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर त्यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशी माहिती श्री प्रकाश खांडेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस ठाणे मुंबई
यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com