वाघोली पोलीसानी अट्टल सोनसाखळी चोर मारुती आंधळेचया आवळल्या मुसक्या…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दि.०६/०४/२०२५ रोजी मौजेकेसनंद थेऊर रोड, पाटील वस्ती ता. हवेली जि. पुणे येथुन फिर्यादी वांचे गणेश किराणा स्टोअर नावाचे दुकानात दोन आनोळखी इसम मोटारसायकलवर येवुन त्यातील एक जण हॉटेल मधील काऊंटरजवळ आला व बिस्किट, चॉकलेट मागण्याचा बहाण्याने फिर्यादी यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावुन चोरी करून घेवुन गेले होते. त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.रजि.नं.११५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रभाणे गुन्हा दाखल आहे.

सदर दाखल गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पो-स्टे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनकडील तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, संतोष शेरखाने, मारुती वाघमारे, अमोल सरतापे, गहिणीनाथ बोयणे यांनी तसेच पोलीस अंमलदार विशाल गायकवाड यांचे तांत्रिक विश्लेषण द्वारे दाखल गुन्ह्यातील आरोपी नाने मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय ३८ वर्षे रा.मु. लिंबोडी पोस्ट. देवीनिमगाव ता. आष्टी जि. बीड वास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन आरोपीकडुन सोन्याचे मिनी गंठण १,००,०००/-रु किं. चे जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी ना.पोलीस उप आयुक्त परी ४, पुणे शहर श्री. सोनय मुंडे, मा. सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे श्री. युवराज हांडे, पोउपनिरी वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, विशाल गायकवाड, अमोल सरतापे, संतोष शेरखाने, गहिणीनाथ बोवणे, मारुती वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट