वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर याची रेसिंग करणारे दोन गाडयांवर धडक कारवाई

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
दिनांक ०९/०४/२०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हददीतील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटी वाघोली येथे अंतर्गत रोडवर दोन गाड्यामध्ये रेसिंग करित असले बाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन रेसिंग करणा-या महिंद्रा कंपनीची थारगाडी नंबर एम.एच.-१२-व्ही.क्यू.-८२१८ व महिंद्रा कंपनीची स्कॅर्पीओगाडी नंबर एम.एच.-१२-एक्स.एक्स.-४९५१ या दोन्ही गाड्या चालकासंह ताब्यात घेवुन दोन्ही गाडयांवर वाहतुक शाखा, वाघोली पुणे यांचे मार्फतीने मोटार वाहन कायदा कलम ३(१)/१८१, १८४, १९४वी (१), १३९/१७७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त परि. ४. पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. युवराज हांडे, पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, वाघोली वाहतुक विभागाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी केली आहे.