वाघोली पोलीस पुणे शहर यानीअंमली पदार्थाची (गांजा) विक्री करणा-या सराईत इसमास केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दि.२८/०५/२०२५ रोजी वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल व तपास पथकाची एक टिम तयार करून त्यांना योग्य ते निर्देश देऊन अवैधधंदे तसेच अंमली पदार्थ कारवाईचे अनुषंगाने खाना केले होते. त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल व त्यांची टिम लोहगाव चौक परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार समीर भोरडे यांना अभिषेक लॉन, लोहगाव चौक या ठिकाणी लोहगावकडे जाणारे रोडवर एक इसम त्याचे हातामध्ये एक बॅग घेवुन संशयीतरीत्या जाताना दिसला म्हणुन त्यांनी सदर इसमाकडे स्टाफ करवी चौकशी करुन बॅगची तपासणी केली असता त्याचे बॅगेत ८ किलो ४०२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व एक मोबाईल असा एकुण १,६९,३४०/-रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आला.
सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता त्यांने त्याचे नाव सुरेश साहेबराव पाटील वय ४४ वर्षे रा.मु. पो. हिसाळे ता. शिरपुर जि. धुळे असे असुन सदर गांजा विक्री करणा-या इसमा, विरूद्ध, वाघोली, पो.स्टे.गु.र.नं.२२१/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट, क८ (क), २० (ब) (ii) (ब), अन्वये दि.२९/०५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयातील आरोपीस मा. न्यायालयाने दि.०२/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक बागल हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिंमत जाधव मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, श्री. युवराज हांडे, सहा. पोलीस निरीक्षक विनायक आहिरे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, व पोलीस अंमलदार रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे, मंगेश जाधव, पांडुरंग माने, साई रोकडे, सालके, आसवले, प्रशांत धुमाळ, शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.