वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी अग्नीशस्त्र व सत्तूरचा वापर करून दहशत निर्माण करणा-या आरोपीला व त्याचे साथीदाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद..

सह संपादक-रणजित मस्के
पुणे
सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेतेबाबत सूचना दिल्या आहेत, खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सक्त सूचना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, श्री. शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत. दिनांक ०३/०३/२०२५ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पीएमसी कॉलनी नंबर ०९, घोरपडे पेठ याठिकाणी अनिकेत गायकवाड रा. काशेवाडी याचेकडे पिस्टल व लोखंडी धारधार सत्तूर असुन तो पीएमसी कॉलनी घोरपडे पेठ याठिकाणी केप कापण्यासाठी उभा आहे, अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, व पोलीस उप-निरीक्षक श्री. प्रल्हाद डोंगळे यांना कळविले असता त्यांनी ती गा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे यांना कळविले असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, पो.शि. कृष्णा गायकवाड, किरण ठवरे, विश्वजित गोरे असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणाचे जवळपास आडबाजुस वाहन पार्क करुन सर्व स्टाफ बातमीचे ठिकाणी पायी पायी जावून, स्टाफचे मदतीने बातमीचे ठिकाणी वेगवेगळे पथक करुन सापळा रचुन पाहणी करता बातमीप्रमाणे इसम नामे अनिकेत गाकयवाड याठिकाणी उभे असलेले दिसला त्याची व स्टाफची नजरानजर होताच तो त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्याला स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर त्याला शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत दिपक गायकवाड वय १९ वर्षे रा. अविनाश बागवे यांचे ऑफिसजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अनिकेत गायकवाड याचे पॅन्टमध्ये कंबरेस उजव्या बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल व त्याचे वापरते दुचाकी गाडीचे डिक्कीमध्ये एक लोखंडी सत्तूर मिळुन आले. त्याचेकडील एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची प्रत्येकी किंमत ५५०००/- रूपये व एक लोखंडी सत्तूर त्याची किंमत रुपये ५००/- किंमतीचा व वेस्पा दुचाकी गाडी त्याची किंमत ९०,०००/- रूपये असा एकूण १,४५,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास दिनांक ०४/०३/२०२५ रोजी ०४/१०वा. अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. प्रल्हाद डोंगळे हे करीत आहे.
नमुद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व श्रीमती अनुजा देशमाने, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्री शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पो.निरी. श्री. अनिल सुरवसे, पो. उप-निरी, श्री. प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, विश्वजीत गोरे, अक्षयकुमार वाबळे, योगेश चंदेल, मयूर काळे, शोएब शेख, यांचे पथकाने केली आहे.