वाचू आनंदे – व्रत वाचन संस्कृती आंगिकारण्याचे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयात व्याख्यानमाला संपन्न – पुष्प 4

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :– मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘वाचू आनंदे व्रत वाचन संस्कृती’ आंगिकारण्याचे या नविन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातर्गत पुष्प ४ संपन्न झाले.
अक्षय तृतीयाच्या मुहुर्ताचे औचित्य साधून वाचू आनंदे व्रत वाचन संस्कृती आंगिकारण्याचे या उपक्रमांतर्गत नवोन्मेष व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी प्रसाद कुलकर्णी यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसाद कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून झाली. प्रमुख पाहुण्यांचे डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ लोहमार्ग यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक भाषण करुन वाचू आनंदे- व्रत वाचन संस्कृती आंगिकारण्याचे या उपक्रमाची सर्वांना माहिती करुन दिली.






सिद्धहस्त कवी, संवेदनशील मनाचा गीतकार, हजरजबाबी निवेदक, प्रभावी वक्ता, सकारात्मक वृत्तीचा स्तंभलेखक, मराठी शुभेच्छा पत्रांचा जनक अशा अनेक नात्यांनी महाराष्ट्राला परिचित असलेले श्री प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांचे खुमासदार शैलीत वाचन आणि त्याचे महत्व या विषयावर आपले प्रभावी भाषणातून मार्गदर्शन केले. त्यानंतर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांनी उपक्रमाबद्दल मान्यवरांना व उपस्थिताना माहिती दिली तसेच उपस्थित एकूण 200 पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रलयीन अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com