उसाचे शेतामध्ये लावलेला १५ किलो वजनाचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर

मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांनी अवैध अंमली पदार्थ साठा, विक्री व शेती करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशदिले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी जाणारे रोडवरील विठलाई परिसरातील उसाचे शेतामध्ये एका इसमाने गांजाची काही झाडे लावलेली आहेत. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांचे पथकासह सदर ठिकाणी दि.१७.०४.२०२५ रोजी छापा टाकुन उसाचे शेती मालक नामे जयदिप यशवंत शेळके वय ४२ धंदा शेती रा.शेळकेवाडी ता करवीर जि कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्याचे मालकीचे उसाचे शेतामध्ये काही गांजाची झाडे मिळून आल्याने सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून एकुण १५ किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण १,५०,५००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. शेती मालक नामे जयदिप यशवंत शेळके यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द करवीर पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, मा.अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पोवार, राजु येडगे, योगेश गोसावी, प्रदिप पाटील, विशाल खराड शिवानंद मठपती, अमित सर्जे, नामदेव यादव, संतोष बरगे, महादेव कुराडे, अमोल कोळेकर, यशवंत कुभार यांनी केली आहे.