आगामी सन- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलीस दलाची जय्यत तयारी….

. सह संपादक- रणजित मस्के






गोंदिया ;कायदा व. सुव्यवस्थाची परिस्थिती हाताळण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज…!🕹️ आगामी काळात साजरे होणारे सन-उत्सव होळी, धुळीवांड, रंगपंचमी, गुडी पाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी उत्सव निमित्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी, सन उत्सव निर्विघ्नपणे, पार पाडण्याकरिता आणि सक्षमपणे परिस्थिती हाताळण्याकरिता प्रत्येक उपविभाग, सर्व पोलीस ठाणे स्तरावर शांतता समिती, मोहल्ला कमिटी च्या बैठका घेण्याचे तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीवर प्रतिबंधक कारवाई, करण्याकरीता ठिक- ठिकाणी नाकाबंदी व रूटमार्च , दंगा काबू मॉक ड्रिल चे आयोजन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निर्देश जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुख यांना दिले आहेत या निमित्ताने मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील का.व.सु. ची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्याकरीता, शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यांतील 4 उपविभाग अंतर्गत एकूण 16 पो. ठाणे स्तरावर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर वचक निर्माण व्हावा, अवैध कृती करणाऱ्यावर प्रभावी कारवाईची मोहीम राबविण्यात यावी, नाकाबंदी, रूट मार्च, शांतता, मोहल्ला समिती च्या बैठका, मोठ्या प्रमाणात गाव भेटी, संपर्क अभियान, व शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती/गुन्हेगार यांचे विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरीता उपविभाग, पोलीस ठाणे स्तरावर शांतता समिती बैठका तसेच गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई, करण्याकरीता ठिक- ठिकाणी नाकाबंदी व रूटमार्च चे आयोजन करण्यात आले आहे. सन उत्सव उत्साहात आनंदात निर्विघ्नपणे साजरे करण्याच्या निर्देश सूचना शांतता समितीच्या , दक्षता समितीच्या बैठकीत उपस्थित गावं पातळी वरील पोलीस पाटील, शांतता समितीतील सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, यांना देण्यात आलेल्या आहेत….गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च द्वारे शक्तिप्रदर्शन करीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मोठ्या संख्येने दंगा काबू पथक, शीघ्र कृती दल, चार्ली पोलीस पेट्रोलिंग पथक यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी, व पोलीस अमलदारांचा मोठ्या संख्येने समावेश असलेले रोडमार्च काढण्यात आले.. सदरच्या प्रभावी रोडमार्च मुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागलेली असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, सक्षमपणे हाताळण्याकरिता पोलीस दल सज्ज झाले आहे…. गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदा, सुव्यवस्थे च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला, नागरिकांना सण उत्सव उत्साहात, शांततेत सौहार्दपुर्ण वातावरणात निर्विघ्नपणे आपसी सामंजस्य राखून साजरा करण्याची….. त्याचप्रमाणे सण उत्सव साजरा करत असताना या काळात गुन्हेगारी करणाऱ्या प्रवृत्तीच्या इसमांची – व्यक्तीची माहिती पोलीस प्रशासनास कळवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे…