आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक व सन उत्सवाचे अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील अट्टल गुन्हेगार सांगली जिल्हयातुन ६ गहीन्यासाठी हद्दपार..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– हदपार इसमाचे नाव राहूल मच्छिंद्र नाईक वय २५ वर्षे धंदा मजुरी रा. नरवाड रोड, आरग ता. मिरज जि. सांगली.
मा. पोलीस अधिक्षक श्री संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक श्री रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर यांचे मार्गदर्शनाखाली शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द चे गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी नामे राहूल मच्छिंद्र नाईक वय २५ वर्षे धंदा मजुरी रा. नरवाड रोड, आरग ता. मिरज जि. सांगली याचेवर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मारहाण, गर्दी मारामारी, चोरी, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपीचे वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असलेने त्याचे विरुध्द मा. उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांतअधिकारी मिरज यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) प्रमाणे हद्दपार करणेवावत प्रस्ताव पाठविला असता मा. उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांतअधिकारी मिरज यांनी सदर प्रस्तावावरती सुनावणी व चौकशी करुन इसम नामे राहूल मच्छिंद्र नाईक वय २५ वर्षे धंदा मजुरी रा. नरवाड रोड, आरग ता. मिरज जि. सांगली यास सांगली जिल्हयातुन दिनांक
०५/०४/२०२४ रोजी पासुन ६ महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई व संबंधीत आरोपीविरुध्द प्रस्ताव तयार करण्याची कामगीरी पोलीस निरीक्षक भैरु तळेकर- मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, यांचे गार्गदर्शनाखाली सपोनि रणजीत तिप्पे, पोह रावसाहेव सुतार, सचिन गोरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com