सातारा जिल्हयामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ई-सव्हिस शीट पोर्टलचे अनावरण

0
WhatsApp Image 2023-11-02 at 1.56.01 PM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख यांचे अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयामधील सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार तसेच लिपीक व शिपाई यांचे सेवापट ई-सर्व्हिस शीट पोर्टलचे माध्यमातून संगणक अगर मोबाईलवर पाहता येणार आहे. याचे अनावरण आज दिनांक 31/10/2023 रोजी 15.30 वा पोलीस मुख्यालय सातारा येथे पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख यांचे हस्ते झाले. या उद्घाटनाचे वेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमतो आंचल दलाल, पोलीस निरीक्षक श्री. कोडीराम पाटील प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा तसेच पोलीस मुख्यालय व शाखेमधील पोलीस अंमलदार हजर होते. तसेच सदरचे उद्घाटनास ऑनलाईन व्ही. सी. द्वारे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार हजर होते. पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर कडव, वाचक अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले असून पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख यांनी ई-ऑफिस पोर्टलची आवश्यकता व त्याचे महत्व स्पष्ट करत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी याचा वापर करावा असे आवाहन केले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती, आंचल दलाल यांनी या ई-ऑफिस पोर्टलची प्रस्तावणा केली. तदनंतर पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख यांनी ई-ऑफिस पोर्टलचे अनावरण केले. ई-ऑफिस पोर्टलमध्ये 70% पोलीस अंमलदार यांचा डेटा अद्यावत करण्यात आला असून उर्वरित डेटा अद्यावत करण्याचे कामकाज सुरु आहे. ई-ऑफिस पोर्टल हे डिसकेअर डेव्हलपर्स प्रा.लि. पुणे यांनी तयार केले असुन त्यांचे संचालक म्हणून श्री. विवेक मैगजी व त्यांची टिम पाहत असून पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. पोलीस निरीक्षक श्री. कोंडीराम पाटील प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व सांगता केली.

या नूतन अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयामधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांचे युजरनेम व पासवर्ड वापरुन लॉगीन करता येईल तसेच यामध्ये दोन प्रकारचे सिक्युरीटी देण्यात आल्या असुन जसेकी प्रथम लॉगीन केले असता पासवर्ड बदलणे व प्रत्येक लॉगीनचे वेळी ओ.टी.पी. टाकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

या ई-सर्व्हिस पोर्टलमध्ये सेवापुस्तकाचे पहिला पान बक्षीसाचे शेवटचे पान, शिक्षेचे शेवटचे पान, रजेचे शेवटचे पान व इंक्रिमेंटचे शेवटचे पान यांची माहिती पीडीएफ स्वरुपात देण्यात आलेली आहे. तसंच एम.एस. सी. आय. टी. नॉमीनेशन, अवगत भाषा याबाबतची माहिती यामध्ये हो/ नाही अशा पद्धतीने अद्यावत करण्यात आलेली आहे. तसेच मागील 10 वर्षातील सव्हिसशीट रिमार्क (B.BA.A- अशा स्वरुपात) पाहता येणार आहेत. तसेच वरील माहितीमध्ये काही दुरुस्ती अगर बदल करावयाचा असल्यास त्रुटी नावाचा टॅब देण्यात आलेला आहे. सदर टॅबमध्ये आपण आपल्याला आवश्यक दुरुस्तीबाबतच्या सूचना देता येतील.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट