अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मोखाडा पोलीस ठाणे यांचेकडून कारवाई..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.

पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक १०/०७/२०२५ रोजी मोखाडा पोलीसांना नाशिक बाजुकडून जव्हार बाजूकडे एका टाटा कंपनीच्या इंट्रा गाडीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची गोपणीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मौजे पवारपाडा गावचे हद्दीत, नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना एक टाटा कंपनीचा इंट्रा पिकअप टेम्पो क्र. MH-48-CQ-3034 हा येत असताना त्यावरील चालकास गाडी थांबवून त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मुजिब अजगर मनियार, वय ४८ वर्षे, रा. मेन रोड मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर असे सांगितले. नमूद पिकअपमधील मालाबाबत विचारले असता गाडीमध्ये कुरकुरे, गाया, पडदे भरल्याचे सांगितले. परंतु पोलीसांना संशय आल्याने नमूद गाडी चेक केली असता वर नमूद मालाच्या खाली विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू असा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकूण २,३४,२००/- रूपये किंमतीचा तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ मिळून आला. सदर आरोपीकडून गाडीसह एकूण ४,८४,२००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचेविरुध्द मोखाडा पोलीस ठाणे येथे ११८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १२३, २२३,२७४,२७५, यह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२) २७, २३, २६(२), (४) ३० (२) (अ) सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना अ. सु.म.अ./अधिसुचना/५८१/२०२४/७ दि.१२/०७/२०२४ Regulation No 2,3,4 of Food Safety & Standards (Prohibition and Restrictions on Sales) Regulation 2011, सहवाचन Regulation no.3,1,7 of Food Safety & Standards (Food Products Standards and Food Additives) Regulation 2011 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/प्रतिक पोकळे, नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रेमनाथ ढोले, पोउपनिरी/श्रीकांत दहिफळे, पोउपनिरी/प्रतिक पोकळे, पोहवा/५६२ भास्कर कोठारी, पोहवा/मुंढे, पोशि/दत्तु पवार सर्व नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे तसेच पोशि/राजगुरे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट