अनैसर्गिक संबंधाचे कारणावरुन खुन करणा-या अज्ञात आरोपी रमेश सत्रे यांस पुणे युनिट १ ने 24 तासाच्या आत केली अटक

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दि.०४/०५/२०२५ रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये मंडई मेट्रो रेल्वे स्टेशनच्या समोरील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये एका ५० ते ५५ वयोगटाचा अनोळखी इसम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा कॉल पोलीसांना प्राप्त झालेला होता. त्यास उपचारकामी ससुन हॉस्पीटल येथे घेवुन गेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केल्याने विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. १३८/२०२५ मा.न्या.स. कलम १०३ (१) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणने बाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्यानुसार घटनास्थळावरील गुप्त बातमीदारामार्फत मयत व्यक्तिस मारणारा इसम रमेश प्रकाश सत्रे वय २१ वर्षे, रा. मु.पो. कातरड, ता. राहुरी जि. अहिल्यानगर हा त्याचा भाऊ याचे फ्लॅट नं.५०३, बो-हाडे मळा, शिरुर पुणे येथे लपला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ युनिट ०१ कडील अधिकारी व स्टाफ यांनी शिरुर येथे जावुन आरोपी रमेश सत्रे यास ताब्यात घेतलेले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. संजय देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-१ श्री. शब्बीर सय्यद, सपोनि अभिजीत पाटील, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, अभिनव ‌लडकत, अमित जमदाडे, निलेश साबळे, शुभम देसाई यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट