कराड मधील अवैद्य कत्तलखान्यांनवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाची कारवाई गोवंश जातीच्या ४४ जनावरांची सुटका व गोमांसाचा साठा जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
कराड:-सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधिक्षक श्री. आंचल दलाल यांनी बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनीयम याची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल पाटील पो.हवा. प्रविण पवार, पोलिस नाईक सागर बर्गे पोलीस नाईक दिपक कोळी यांना शहानिशा करणे करीता कराड शहरातील भाजी मंडई, कसाईवाडा गुरवार पेठ येथे पाठविले असता तेथे एकुण ०५ ठिकाणी गोवंश जातिची एकुण ४० जनावरे कत्तलीकरीता बांधुण ठेवल्याचे अढळुन आले तसेच सुमारे १५८० किलो मांस कातडेसह आढळुन आले तसेच मुजावर कॉलनी येथे देखील ४ गोवंश जातीच्या गाई कत्तली करीता बांधुन ठेवल्याचे अढळुन आले त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी के.एन. पाटील, डीबी पथक प्रमुख पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अझरुददीन शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने आर.सी.पी पथक यांचे सहय्याने तात्काळ गोवंशाची सुटका करण्यात आली व त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली तसेच पशुवैदयकीय अधिकारी यांचे समक्ष गोमंस जप्त करण्यात आले. सदर कारवाई मध्ये अत्तापर्यंत १) मज्जीद हमीद बेपारी याचे मालकीचे शेडमध्ये इसम नामे २) अब्दुल रेहमान बापुसाहेब बेपारी ३) फारुख कुतबुद्दीन बेपारी ४) बशीर कादीर बेपारी ५) नदीम असलम बेपारी ६) मोहम्मद हारूण बेपारी सर्व रा. कुरेशी मोहल्ला कसाईवाडा, गुरुवारपेठ कराड यांना आपसांत संगणमताने बेकायदा बिगरपरवाना गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मांस विक्री व वाहतुक करीत असल्याची तसेच गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबुन ठेवल्याने ताब्यात घेण्यात आलेले असुन वाहतुकी करता वपरत असलेली दोन चारचाकी वाहने व एक तीन चाकी वाहन देखील जप्त करण्यात आलेली आहेत.
सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधिक्षक श्री. आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के.एन. पाटील, वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल पाटील, पतंग पाटील, अझरुददीन शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने सहय्यक पोलीस फौजदार संतोष सपाटे पोलीस हवलदार महेश लावंड, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, पोलिस नाईक सागर बर्गे, दिपक कोळी. पो. हवा. वसीम संदे, शशी काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे पो.कॉ. दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, सागर भोसले, मपोकों सोनाली पिसाळ, आरसीपी प्लटुन सातारा यांनी सहभाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com