वाशी येथील दरोडा मधील अज्ञात आरोपीतांना २४ तासांत वाशी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

वाशी :-वाशी पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी हे त्यांचे राहते पत्त्यावरून येथुन तुर्भे एमआयडीसी कडे त्यांचे मो/वाहनातुन जात असताना वाशी ब्रिज खालुन पामबीचकडे जाणारे सहींस रोड, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई येथे अनोळखी इसमांनी फिर्यादीचे मो/वाहन थांबवुन त्याचे मो/वाहनाचे पाठीमागे व पुढे दोन मो/वाहन आडवे लावुन त्यातील अनोळखी ०६ इसमांनी ते मुंबई पोलीस असल्याचे सांगुन फिर्यादी यांचेकडे पैशांचा साठा असलेबाबत अनेक तक्रारी आलेले असुन त्यामध्ये फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबियांना अडकवण्याची धमकी देवुन त्यातुन वाचवण्याकरीता २ कोटी खकम मागुन धमकी व शिवीगाळी करून त्यांचे मो/वाहनामधुन श्रीश्ला को. ऑप. सोसायटी, प्लॉट नं. ८२, सेक्टर २९, वाशी, नवी मुंबई येथे घेवुन जावुन व फिर्यादीला धमकावुन तेथुन २ कोटी रक्कम घेवुन गेले म्हणुन दिनाक ३०/०३/२०२४ रोजी दिलेले तक्रारीवरून वाशी पोलीस ठाणे गु.र.नं १३६/२०२४ भादवि कलम ३९५, ३६३, ३४१, ३४२, १७०, ५०४, ५०६, १२० (ब) अन्वये नोंद करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा यातील अज्ञात आरोपीतांनी कोणताही धागा दोरा मागे न ठेवता सराईत पणे केलेला होता. सदर गुन्हयाचे गांभिर्व लक्षात घेवुन मा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवुन वाशी पोलीस ठाणे स्तरावर ०३ वेगवेगळे पथक व गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे कडील ०४ वेगवेगळे पथके तयार करण्यात आलेले होते. सदर पथकाने आरोपीतांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा घटनास्थळापासुन सीसीटीव्ही कॅमे-याव्दारे व तांत्रिक तपासाव्दारे मागोवा घेतला असता सदरचा गुन्हा हा सहा इसमांनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले होते.

आरोपीतांची ओळख पटवुन त्यांचे राहते परिसरात सापळे लावुन त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपीतांकडे सखोल व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता अटक आरोपीतांपैकी एक आरोपी हा फिर्यादी यांचे कडे चालक म्हणुन नोकरी करीत होता. त्यास कामावरून काढल्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादी यांचे व्यवसाय व कुंटबा बाबत इंतभुत माहीती ईतर आरोपीतांना दिली.

त्यांनतर सर्व आरोपी एकत्रित येवुन करावयाच्या कृत्या बाबत आराखडा बनवुन त्याव्दारे फिर्यादी यांचे राहते घरापासुन पाठलाग करून वाशी येथील घटनास्थळी मोटार वाहन आडवे लावुन मुंबई पोलीस असल्याचे सांगुन फिर्यादी यांचेकडे पैशांचा साठा असलेबाबत अनेक तक्रारी आलेले असुन त्यामध्ये फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबियांना अडकवण्याची धमकी देवुन त्यातुन वाचवण्याकरीता २ कोटी खकम मागितले व त्यांना धमकी व शिवीगाळी करून त्यांचे मो/वाहनामधुन घेवुन जावुन त्यांचेकडुन २ कोटी रोख रक्कम घेवुन पळुन गेले.

अटक आरोपीतांपैकी एक आरोपी हा ठाणे ग्रामिण आस्थापनेवर पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असुन त्याची नेमणुक ही सुरक्षा शाखा येथे आहे.

सदर गुन्हयात सहा आरोपी अटक करण्यात आलेले असुन त्यांना मा. न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयने त्यांना दिनांक ०९/०४/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. पवन नादे. सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

अटक आरोपीतांची नावे :-

१) मोहन शिवराम पाडळे वय ४७ वर्षे, धंदा कॉन्टॅक्टर, रा. रूम नं. ५४६, एसएस २, सेक्टर ०६,
साईबाबा मंदीर वय जवळ, कोपरखैरने, नवी मुंबई

२) उदय साहेबराव कवळे वय ४२ वर्षे, धंदा नोकरी, रा. रूम नं. ०१, अडागर चाळ, सुर्यानगर, पवई रोड, विक्रोळी प., मुंबई

३) विलास दत्ताराम मोहीते ५० वर्षे, धंदा चालक, रा. मोहननगर झोपडपटटी, रूम नं. २९, विदयाविहार पुर्व, राजावडी, घाटकोपर, मुंबई

४) नारायण उर्फ सागर भागवत सावंत वय ३५ वर्षे, धंदा कार विक्री, रा. जयभिम नगर, रहीवाशी सेवा संघ, कन्नमवार नगर न. २. विक्रोळी पुर्व, मुंबई

५) नितीन भिकाजी विजयकर वय ५५ वर्षे, धंदा नोकरी, रा. प्रसाद अपार्टमेंट, रूम नं. ६०५, ए विंग, जनता मार्केट, भांडुप प., मुंबई ७८

६) मोहन भानुदास पवार वय ३५ वर्षे, धंदा चालक, रा. एसएस २, रूम नं. ६१८, सेक्टर १५, कोपरखैरने, नवी मुंबई

सदरची यशस्वी कामगिरी श्री. मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री. संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त नवी मुंबई, श्री. दिपक साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नवी मुंबई, श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नवी मुंबई, श्री. पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ नवी मुंबई, श्री. अजयकुमार लांडगे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) नवी मुंबई, श्री. योगेश गावडे, सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मधुकर भटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई, श्री. सुनिल शिदि, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हे शाखा, नवी मुंबई, व पथक श्री. आबासाहेब पाटील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष ०१ नवी मुंबई, व पथक श्री. हानिफ मुलानी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष ०३ नवी मुंबई व पथक, श्री. संजय नाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई, सपोनि. पवन नांदे, सपोनि सत्यवान बिले, पोउपनि. निलेश बारसे, पोहवा /१०५४ चिकणे, पोहवा /१८५० वार्ररींगे, पोना/२७२१ म्हसकर,
पोना/२६९६ पाटील, पोना / ३१५४ ठाकूर, पोशि/२८२६ ठाकरे, पोशि/३१९२ डगळे, पोशि/१२२९३ खिल्लारे, पोशि/३७०८ खाडे वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी वशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट