भुईज मधील अज्ञात आरोपीने केलेला खुनाचा गुन्हा भुईज पोलीसांनी केला ८ तासात उघड

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक २४/११/२०२३ रोजीचे रात्री १०.३० वा ते दिनांक २५/११/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० या. दरम्याण मौजे भुईज ता. वाई जि.सातारा गावचे हद्दित प्रियदर्शनी बालकमंदिर मुईज या अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन मयत इसम नामे अनिल नामदेव कुचेकर वय ३५ वर्ष २. 1/2 स्वर ईज यास जिवे मारणेचे उद्देशाने त्याचे डोक्यात, तोंडावर पायावर कश्याने तरी मारुन त्याचा खुन केला आहे म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद युवराज तुकाराम कुचेकर रा. भुईज ता. याई यांनी दिल्याने भुईज पोलीस ठाणे गु.र.नं – ५०३/२०२३ भादविस कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

अज्ञात आरोपीने क्रूरपणे खुन केलेने सदरचा गुन्हा उघड करणेबाबत मा.श्री समीर शेख, भा. पो. से. पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा.श्री.बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सुचना दिल्या होत्या. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ मुईज पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी घटनास्थळचे आसपासचे ८ ते १० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून मयत इसमासोबत असणारे इसमांची माहिती मिळाली. सदरचे दोन्ही इसम हे गुन्हा करुन फरार झाले असलेबाबत तांत्रिक माहितीवरुन समजून आले. त्यांना तांत्रिक माहितीचे आधारे भुईज पोलीस ठाणे व वाई पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी खुन करणारे दोन्ही इसमांना कोंढवा जि. पुणे येथून ताब्यात घेतले.

श्री. समीर शेख, मापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री.बाळासाहेब मालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे पो.नि. वाई पोलीस ठाणे, संतोष तासगावकर स.पो.नि मेढा पोलीस ठाणे, सपोनि रमेश गर्जे भुईंज पोलीस ठाणे, पोउनि. विशाल भंडारे, स.पो. फौजदार वैभव टकले, विजय अवघडे, राजकुमार किर्दत, पो. हवा. नितीन जाधव, अरुण दगडे, चंद्रकांत भोसले, गोकुळ बोरसे, सुहास कांबळे, सुशांत धुमाळ, पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णकर, सागर मोहिते, किरण निवाळकर, सतीश कदम, प्रशांत ठोंबरे, वाई पोलीस ठाणेचे पो.कॉ. श्रवण राठोड, हेमंत शिंदे, प्रेमजित शिर्क मेढा पो. ठाणेचे पो.कॉ. सनी काळे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे. सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर ८ तासात उघडकीस आणले बाबत सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन होत आहे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट