संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस यांच्या तर्फे ताज हॉटेल वरील शहिदांना श्रद्धांजली…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी हॉटेल ताज महाल पॅलेसला भेट देऊन २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाला श्री. गुटेरेस यांनी भेट देऊन पाहणी केली. मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या अमानुष हल्ल्याचा श्री. गुटेरेस यांनी निषेध केला. जगभरात फोफावलेला दहशतवाद हा माणुसकीसमोरचे मोठे आव्हान असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुमारी देविका रोटावन यांची देखील श्री. गुटेरेस यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट