युनिट 6 गुन्हे शाखेने मोक्का गुन्ह्रामध्ये जामिनावर असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस केले जप्त

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे दि.13/02/2025 रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट 6 कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व युनिट 6 कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सकटे यांना मिळालेल्या खबरीवरून मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेला अभिलेखावरील आरोपी **अनिकेत गुलाब यादव ,वय 22 वर्षे सोपाननगर ,कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे** येथुन ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस मिळून आले असुन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीताविरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. 89/2025 आर्म अॅक्ट कलम 3,25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(अ) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपास कामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. **सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे -2) श्री.राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी,पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे,नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे,सचिन पवार,ऋषीकेश व्यवहारे,शेखर काटे,गणेश डोंगरे,समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे,सुहास तांबेकर,म.पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट