युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर यांनीवाहन चोरीचे २ गुन्हे केले उघड…!

0
Spread the love

पुणे

सह संपादक -रणजित मस्के

दि.०९/०७/२०२५ रोजी युनिट ६, गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस अंमलदार युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सचिन पवार यांना पेरणे फाटा, लोणीकंद येथे एक इसम चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेवरून सदर ठिकाणी युनिट पथकाने सापळा लावून इसम नामे दीपक राजेंद्र बिडगर, वय २३ वर्षे, रा. न्हावरा, शिरूर, पुणे हा त्याचे ताब्यात हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मो/सा सह मिळून आला. नमूद इसमाकडे मो/ सा बाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने मो/ सा च्या इंजिन व चासी नंबर वरून माहिती घेतली असता सदर बाबत शिक्रापूर पो.स्टे. येथे गु.र.नं. ६२०/२०१९, भा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

क्सेच स.पो.नि. राकेश कदम, पो.अं. पवार, ताकवणे, व्यवहारे काटे असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना वाघोली पो. स्टे. हद्दीत भावडी रोड येथे इसम नामे मच्छिंद्र दिगंबर खैरनार, वय ४१ वर्षे, रा. रांजणगाव, पुणे हा त्याचे ताब्यात होंडा शाहीन मो / सा सह संशयितरित्या मिळून आला. नमूद इसमाकडे मो/सा बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे व सदर बाबत म्हाळुंगे पो.स्टे. गु.र.नं. ३५७/२०२३, मा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. वर नमूद दोन्ही इसमांना हस्तगत वाहनांनसह पुढील कायदेशीर कारवाई कामी संबंधित पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर, पुणे शहर, अति. कार्य, गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट