युनिट ३. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी घरफोडीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी अंगदसिंग कल्याणीस केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पूणे

दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीचा गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टॉफ शोध घेण्याकरीता पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार बोडरे व शिरोळकर यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं ३३१/२०१९ भारतीय दंड संहिता कलम ४५४,३८० वा गुन्हयातील पाहिजे आरोपीत नामे अंगदसिंग अजमेरसिंग कल्याणी वय ४१ वर्षे रा. गाडवे कॉर्नर, वृंदावन पॅलेस, थेऊर फाटा, पुणे हा वानवडी परिसरात आहे. सदरबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सदर इसमाचा शोध घेतला असता रामटेकडी, कोठारी शोरुम बाजुचे गल्लीमध्ये सदरचा इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, अति. कार्य गुन्हे, पुणे शहर श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३ चे श्री. भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अंमलदार मुकुंद तारु, अमित बोडेरे, अमोल काटकर, कैलास लिम्हण, चेतन शिरोळकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट