अनैतिक व्यापार प्रतिबंध अन्वये दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपीस गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :
दिनांक २०/०१/२०२३ रोजी एव्हरेस्ट हौ. सोसायटी नवीन मुंबई आग्रारोड, नाशिक याठिकाणी राज्यातील व परराज्यातील अशा एकुण ०५ महिलांकडुन त्यांचे इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायास प्रवृत्त करून त्यांचे कमाईवर उपजिवीका भागवुन व अवलंबुन राहुन अनैतिक व्यापार चालविण्यास प्रेरणा दिली. म्हणुन दिनांक २१/०१/२०२३ रोजी मुंबईनाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर २४ / २०२३ भादंविक ३७०, ३४, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करण्यात येवून पिडीत महिला यांना मा. न्यायालयाचे आदेशान्वये त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले होते. सदर गुन्हयात एकुण ०३ आरोपींना अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान आरोपी राकेश विजय कांबळे याचे नाव निष्पन्न झाले पासुन आरोपी राकेश विजय कांबळे हा फरार होता. सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे व मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. प्रशांत बच्छाव यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.

गुंडा विरोधी पथक त्याअनुषंगाने दिनांक २६/०७/२०२३ रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोअंम मिलीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पाहिजे आरोपी नामे राकेश विजय कांबळे हा सीबीएस नाशिक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे अति प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांना देवुन पथकातील अंमलदार यांनी सीबीएस नाशिक येथे सापळा रचुन नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी राकेश विजय कांबळे वय ४९ वर्षे रा. ४३९८ जंगम चौक, राजवाडा, पंचवटी, नाशिक यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले असुन पुढील तपासकामी मुंबईनाका पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त(गुन्हे), श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, अंबादास बकाल, सुनिल आडके, राजेश सावकार, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, संदीप आंबरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com