अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिची मध्यप्रदेशात विक्री करून जबरदस्ती लग्न लावणा-या आरोपींना भारती विद्यापीठ पोलीसांकडून अटक व मुलीची सुखरूप सुटका…
उपसंपादक – रणजित मस्के
भारती विद्यापीठ ( पुणे ) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत राहणारी एक १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची खबर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे दिली सदर मुलगी अल्पवयीन असल्याने अज्ञात आरोपींविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर सदरील गुन्हयाचा तपास अतुल थोरात पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपासादरम्यान वेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी वय १४ वर्षे ही मध्यप्रदेश याठिकाणी असल्याची माहिती मिळून आली. या बातमीची खात्री केल्यानंतर मा. अप्पर पोलीस आयुक्त सारे, पोलीस उपआयुक्त सो यांचे मार्गदर्शनाखाली अतुल थोरात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार ५७८९ रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई ९१३३ सागर कोंडे, महिला पोलीस शिपाई ९४७१ पुजा लोंढे असे मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले.

त्याठिकाणी बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी ग्यारा ग्राम ता. सेवढा जि. दतिया, राज्य मध्यप्रदेश याठिकाणी असल्याची आणि तिचे लग्न झाल्याचे माहिती स्थानिक पोलीसांच्या मदतीने काढली त्यानंतर तेथील तपासपथकाच्या मदतीने ग्राम स्यारा ता सेवढा जि. दतिया मध्य प्रदेश याठिकाणी सदर मुलगी राहत असलेल्या घरामध्ये छापा टाकून मुलीस सुवरूप ताब्यात घेतली. सदर मुलीचे लग्न जबरदस्तीने धर्मेंद्र किलेदारसिंग यादव वय २२ वर्षे रा. ग्राम ग्यारा ता सेवढा जि.दतिया मध्य प्रदेश या अनोळखी इसमाशी लावून दिल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हयाचा अधिक तपास करता अशी हकीकत निष्पन्न झाली सदर मुलगी ही एका वर्कशॉप मध्ये काम करीत असताना त्याच वर्कशॉपमध्ये काम करणारी एक आरोपी महिला शांती ऊर्फ सन्तो हरनाम कुशवाह वय ४० वर्षे, रा. मु.पो. गिरवासा तालहर नि भिण्ड, मध्य प्रदेश हिने तिच्या आवडीचा दुसरा एकमुलगा मध्यप्रदेश येथे गेला आहे व त्याने तुला लग्नासाठी बोलविले आहे असे खोटे सांगून फूस लावून मध्यप्रदेश याठिकाणी घेवून गेली. यातील आरोपी धर्मेंद्र यादव याने महिला आरोपी हिला लग्नासाठी मुलगी पाहिजे तु एक मुलगी घेवून ये तुला ५० हजार रूपये देतो असे सांगितले होते त्याप्रमाणे या महिला आरोपीने अल्पवयीन मुलीस फूस लावून मध्यप्रदेशात नेले. त्याठिकाणी धर्मेंद्र याचेकडुन ५० हजार रूपये घेवून तिचे जबरदस्तीने आरोपी धर्मेंद्र यादव याचेशी लग्न लावून दिले. व तिस सांगितले की तु जर याबाबत कोणास काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकू तसेच तुझ्याबद्दल पोलीसांना ही काही कळणार नाही इथपर्यंत कोणीच येवू शकत नाही. त्यामुळे सदरील मुलगी ही कोणास काही बोलली नाही.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपासपथकाने जलद हालचाली करून सदर मुलगी ची सुखरूप सुटका करून तिचे पालकांच्या ताब्यात दिलेली आहे. त्याचप्रमाणे याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन: पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२३ भा. द. वि. क. ३६३, ३६६, ३७६ (२) (आय) (एन), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४, ६, ८, १७ सह बाल-विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, ११ प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्हयात फूस लावून घेवून जाणारी व विक्री करणारी महिला तसेच सदर मुलीस पैसे देवून विकत घेवून जबरदस्ती लग्न करणारा अशा दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-२ पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार सो सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, रवींद्र चिप्पा, सागर कोंडे, पुजा लोंढे, अवधुत जमदाडे यानी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com