मा.पोलीस अधीक्षक औरंगाबाद श्री मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेतून शालेय व महाविद्यालयीन मुले -मुलींसाठी हेल्पलाईन नंबर जारी …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

औरंगाबाद:- मा.पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेतून शालेय तसेच महाविद्यालयीन मुले व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील शाळा, महाविद्यालय तसेच पर्यटनस्थळांचे परिसरात दामिनी पथकाकडून सातत्याने सक्रिय पेट्रोलिंग करण्यात सूचना देऊन संकटसमयी महिला व मुलींना तातडीच्या मदतीकरिता हेल्पलाईन क्रमांक ९५२९६५९९८३ व ११२ हा जारी करण्यात आला आहे.

दामिनी पथकांचे माध्यमांतून शालेय मुला- मुलीसह शिक्षक व पालकांना त्यांचे पाल्याबाबत चांगल्या आणि चाईट स्पर्शाबद्दल तसेच बाल लैंगिक अत्याचारा विषयी व्यापक स्वरूपात माहिती व्हावी या करिता शालेय स्तरावर विद्यार्थी सोबत संवाद साधला जावून शालेय विद्यार्थीना पोलीस आपलेसे वाटुन मुलांनी निसंकोचपणे त्यांना त्रास देणा-या व्यक्तीची तक्रार किंवा त्यांना होणारा त्रास हक्काने सांगु शकतील या दृष्टीकोनातुन शाळा व महाविद्यालयात जनजागृती करण्यात येते आहे.

या अनुषंगाने वैजापुर येथील विनायक पाटील महाविद्यालय, नंदकुमार शिंदे फार्मसी महाविद्यालय, राजे संभाजी माध्यमिक विद्यालय, येथे दामिनी पथकाचे प्रमुख स.पो.नि. आरती जाधव यांनी विद्यार्थाशी संवाद साधतांना सर्वात प्रथम पोलीस हा त्यांचा मित्र असून पोलीसाबाबत मुलींनी मनात कोणतीही भिती किंवा आकस न बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळेत येण्या-जाण्या करिता बस किंवा इतर खाजगी वाहनातून विद्यार्थीनी प्रवास करताना तसेच शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वावरत असतांना त्यांना जर कोणताही व्यक्ती वाईट हेतुन स्पर्श करत आहे. किंवा तुमचा पाठलाग करतो, कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा कुटूंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल सांगुन जवळीक साधत असेल किंवा त्रास देत असेल तुम्हाला बघुन साथी शिटी जरी वाजविली तरी अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलांनी न घाबरता सर्वांत प्रथम याबाबत माहिती ही आई-वडिल किंवा शिक्षक तसेच जवळच्या मित्र मैत्रिणीला तात्काळ सांगितले पाहिजे. आपली बदनामी होईल या भावनेतुन जर कोणी तक्रार केली नाही तर समोरच्या व्यक्तीची हिम्मत अधिक स्वरूपात वाळु शकते.

तसेच मुलींनी कोठेही एकटी वावरतांना स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवुन निडर होवुन संचार करावा व येणा-या प्रत्येक समस्येला सामोरे जाण्याची जिद्द ठेवावी. तसेच अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तात्काळ मदती करिता हेल्पलाईन
कमांक 9529659983 किंवा 112 क्रमांकावर पोलीसांना संपर्क करावा.

यावेळी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, महिला विषयक कायदे अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच दामिनी पथकांबाबत माहिती असलेले तसेच हेल्पलाईन क्रमांक असलेले पत्रक हे शाळा व महाविद्यालयाचे परिसरात लावण्यात आले आहे जेणे करून विद्यार्थी त्यांची तक्रार निसंकोचपणे दामिनी पथकाला करतील.

तसेच शिक्षकांनी सुध्दा विद्यार्थीकडून अशा प्रसंगविषयी माहिती घेण्याकरिता मुलांशी संवाद ठेवून शाळेचे परिसरातील वातारण सुरक्षित ठेवण्याकडे अधिक लक्ष द्यावे. स्कुलबसवरिल चालक व मदतनिस यासह इतर कर्मचारी यांची संपुर्ण माहिती ठेवुन त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नौकरीवर ठेवावे परिसरात टवाळखारे किंवा संशयीत इसमांचा वावर दिसल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.

नमुद जनजागृती अभियान हे मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर, यांच मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे प्रमुख सपोनि आरती जाधव, पोलीस ठाणे वैजापुर येथील सपोनि निशा बन्सोड यांचे सह पोलीस अंमलदार कपिल बनकर, इर्षाद पठाण, अमोल मोरे, आयोध्या मुंडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट