बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली बोईसर मध्ये गांजा विकणाऱ्या 20 वर्षीय युवकास पोलिसानी केले अटक…

प्रतिनिधी. मंगेश उईके
बोईसर :-उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी काही दिवसांन पूर्वी बोईसर शहरात ल्या टपऱ्याधारकांची सभा घेतल्यानंतर ड्रग्स विरोधात कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. गुटखा ड्रग्स विक्री करणाऱ्यांची खबर दिल्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितल्या नंतर कारवाई देखील सुरू झालेली आज दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच बोईसर येथील सरोवर हॉटेल याठिकाणी सर्वच टपरीधारकांना बोलवून आता थारा नाही असा प्रेमाचा सल्ला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिल्यानंतर त्याचा परिणाम देखील होऊ लागला आहे.
गुटखा ड्रग्समुळे तरूण पिढी बरबाद होत असून अनेक गुन्ह्यांमध्ये तरूण युवकांचा सहभाग असल्याचे दिसून येत असून गुटखा ड्रग्स सारख्या नशेच्या आहारी जाऊन आज हिच तरूण पिढी चुकीचे निर्णय घेत असल्याची चिंता व्यक्त करत याचा प्रमाण कमी करण्यासाठी गुटखा ड्रग्सवर नियंत्रण आणलेच पाहिजे हे मनाशी पक्के ठरवून पूर्णपणे लोक मैदानात उतरून जंग लढत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले होते.
दि.१९ जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे वेगवेगळे तीन पथक तयार करून सालवड ग्रामपंचायत हद्दीतील यू पी एल कारखान्याजवळ सापळा रचून शिवाजी नगर येथील २० वर्षीय रवींद्र सुर्यबान यादव रा मनोर मुळ राहणार बिलासपूर उत्तर प्रदेश हा त्याठिकाणी गांजा विक्री करण्याच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून अडीच किलो गांजा जप्त करण्यात आलेला असून आरोपीला बोईसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या तीन पथकात सहायक फौजदार आनंदा गावीत, पो शि महेश दवणे, पो शि किरण कोथपुरे, पो शि गोरखनाथ चव्हाण, पो शि जयपाल राजपूत, पो शि पंकज आरेकर, पो शि इंद्रजित मेच्हे, पो शि प्रविण पाटकुलकर, पो शि चंद्रकांत केंद्रे, यांनी यशस्वीरित्या कामगिरी बजावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com