पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देशान्वये आणखी एक अट्टल सराईत गुन्हेगार हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- देवरी हद्दीतील सराईत गुन्हेगार देवरी उपविभाग अंतर्गत हद्दीतून तसेच आमगाव, सालेकसा, हद्दीतून 3 महिन्याकरिता हद्दपार…
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, श्री. प्रवीण डांगे पो. ठाणे. देवरी यांनी केलेली आहे
देवरी पोलीसांनी केलेल्या हद्दपारीच्या कारवाईमुळे देवरी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिलेला आहे….पोलीसांकडून होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ते करीत असलेल्या अवैध कृत्यापासून व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन आपल्या चारित्र्य सुधारून इतर चांगले, वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन केले आहे…. अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com