पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय गोंदिया, येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया:

    गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असतात, कर्तव्य पार पाडतांना त्यांना ताण- तणाव येऊन विविध प्रकारचे आजार- विकार जडले जातात, त्यांचे शरीर सुदृढ आणि निरोगी राहावे या संकल्पनेतुन पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दल व बाहेकर सुपर- स्पेशालिटी हॉस्पीटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील अधिकारी / अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ व त्यांचे कुटुंबीयाकरिता दिनांक- 15/07/2023 रोजी पोलीस मुख्यालय गोंदिया, येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

     आयोजीत शिबीरात बाहेकर सुपर- स्पेशालिटी हॉस्पीटल गोंदिया येथील डॉ. दिपक बाहेकर (एमडी मेडिसिन फिजिशियन कार्डिओ लॉजिस्ट), डॉ. अनुराग बाहेकर (एमडी डीएम इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट), डॉ. गार्गी बाहेकर, (एमएस डीएनबी स्त्री-रोगतज्ञ), डॉ. कविता भगत(नेत्ररोगतज्ञ), डॉ.चंद्रशेखर राणा (एमएस ईएनटी),डॉ.सतिश बन्सोड (आर्थोपेडिक), डॉ. सोनल अग्रवाल (दंतचिकित्सक), डॉ.कांचन भोयर (फिजिओथेरपी), डॉ. रुचिता सोनछात्रा (फिजिओ-थेरपी), डॉ. हर्षल पारधी (आहारतज्ञ), डॉ. तिमेश्वरी मेश्राम (आरएमओ), डॉ. सोनी करमानी (आरएमओ), डॉ. गौरव पटले (आरएमओ) व त्यांचे टेक्निसियन विभाग मधील दिपमाला यादव, रोहित दुबे, कलावती गराडे तसेच कमल चौरागडे (समन्वयक), योगेश पारधी (पीआरओ) यांना पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, व गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

            सदर शिबीरात पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी संबोधित करुन शरिर निरोगी बनविण्यासाठी आपल्या शरीरास कुठ कुठले दुष्परिणाम होतात, ते टाळण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे त्याकरिता डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार पोलीस अधिकारी / अंमलदारांनी त्या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. आधुनिक काळात विज्ञान प्रगत झाल्याने एखादया व्यक्तिला रोग असल्यास त्याला न घाबरता रोगापासुन वाचवणारे औषधही भरपुर निघालेले आहेत. दरवर्षी आरोग्याची तपासणी करुन स्वतःचे आत्म निरीक्षण करणे आवश्यक आहे. आणि ते वेळीच तपासणी केली तर ते आपण चांगल्या पध्दतीने सुध्दा करु शकतो. त्याकरिता प्रत्येकांनी त्याबाबत गांभीर्य घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन जीवन शैलीतील सवयींमध्ये योग्य ते बदल करुन आपले शरीर निरोगी ठेवु शकतो. निरोगी मेंदु हा एका निरोगी शरिरामध्ये जगु शकतो. त्याचाच हा एक भाग म्हणुन आलेले विशेष तज्ञ डॉक्टरांकडुन तपासणी करुन काही शंका असल्यास त्यांना विचारा व त्यांनी दिलेल्या सल्यानुसार त्या गोष्टीचा पालन करा असे उपस्थित पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले व आलेले शिबीरात डॉक्टरांचे आभार मानले..

              तद्नंतर सदर शिबीरात उपस्थित डॉक्टरांकडुन जवळपास एकुण 222 पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर शिबीरात रक्त तपासणी, बी. एम. आय/ई.सी.जी. तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, कोलेस्ट्रॉल व युरिक एसिड तपासणी अशा प्रकारच्या मोफत तपासणी करण्यात करण्यात आल्यात. शिबिरात मोठया संख्येने पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला.

            सदर शिबीरात पोलीस अधीक्षक, यांच्या सह पो. नि. नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे तसेच पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांचे कुटुंबीय हे मोठया संख्येने उपस्थित होते.

           सदर शिबीराचे सूत्र संचालन पो.नि.नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोनि नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे, सफी रोशन उईके, पोहवा राजेश पटले, नैलेश शेंडे, दत्ता राठोड, राज वैद्य, राजु डोंगरे, दिक्षित दमाहे, प्रभाकर पालांदुरकर, धनंजय शेंडे, संजय मारवाडे आणि सायबर टीम, तसेच मपोका दर्शना राणे पोलीस मुख्यालय गोंदिया येथील पो. स्टाफ यांनी सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट