पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांची मार्गदर्शनाखाली ” पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेच्या ” माध्यमातुन ” सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट यांचे संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी शिबीर संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :

⏩ मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कँप देवरी, मा.श्री. संकेत देवळेकर., उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट यांचे संयुक्त विद्यमाने दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातुन नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या अनुषंगाने दि. २४- ०९- २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजता पर्यंत मौजा गोठणगांव व बोंडगांव येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये मौजा गोठणगांव येथे एकुण ११५ नागरीकांची तर मौजा बोंडगांव येथील शिबीरामध्ये एकुण ११८ नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकुण १०० नागरीक हे मोतीबिंदु ग्रस्त असल्याचे आढळुन आले. मोतीबिंदु ग्रस्त नागरीकांची शस्त्रक्रिया ही रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट यांच्या मदतीने शालीनीताई मेघे हॉस्पीटल वानाडोंगरी नागपुर याठिकाणी करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमा करीता रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. राजीव वरधे, श्री. अंकुर कापसे, कार्यकारी अभियंता धापेवाडा प्रकल्प, श्री. अनिल फरकडे कार्यकारी अभियंता गोसेखुर्द प्रकल्प, श्री. सुहास खरे समाजसेवक , पंचायत समिती सदस्या सौ. आम्रपाली डोंगरवार, माजी जि.प. सदस्य श्री. रतिराम जी राणे डॉ. योगेश व पथक हे हजर होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवचे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. सचिन घाटे., पोउपनि शुभम नवले तसेच सफौ. घोरमारे पोहवा. मडावी, भोवते, पुराम, मिसार पोना नखाते, राऊत, वालदे तसेच पोशि. गभणे, लिल्हारे, देवकर व मेश्राम यांनी प्रयत्न केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com