पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशन येथे “महिला तक्रार पेटी” चे अनावरण. स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, समाजा मध्ये महिलां/ मुलीं, आणि शाळकरी विद्यार्थिनी यांचे वर होणाऱ्या अत्याचारां च्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहेत. भीती पोटी व बदनामी पोटी बऱ्याच महिला/ मुली, शाळकरी विद्यार्थिनी पोलीस स्टेशन ला येऊन समक्ष तक्रार देण्यात टाळाटाळ करतात. 

     अशा महिला/ मुलीं च्या तक्रारीची दखल घेण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन येथे तक्रार पेटी तयार करावी व ती तक्रार पेटी पोलीस स्टेशनच्या दर्शनीय भागावर लावावी. तसेच सदर पेटी प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी उघडून तक्रारीची दखल घ्यावी, याबाबतचे आदेश गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिले होते.

             या अनुषंगाने पोलीस स्टेशन केशोरी येथे दिनांक 10/07/2023 रोजी महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये प्रमुख ठाणेदार सोमनाथ कदम, श्रीमती तेजूकला गहाने, माजी जि. प. सदस्य, श्रीमती अर्चना राऊत माजी पंचायत समिती सदस्य, श्रीमती मनीषा नाकाडे, श्रीमती भारती दहीकर, श्रीमती कराडे बचत गट समन्वयिका, महिला दक्षता समितीच्या महिला, गावातील इतर महिला, बचत गटाच्या महिला, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी विद्यार्थिनी असे 120 महिला व नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

   सर्वांच्या उपस्थिती मध्ये पोलीस स्टेशन केशोरीच्या दर्शनीय भागावर "महिला तक्रार पेटी" लावून अनावरण करण्यात आले.

       ठाणेदार सोमनाथ कदम यांनी उपस्थित गावकरी महिला, बचत गटाच्या सदस्य, शालेय विद्यार्थीनी यांना मार्गदर्शन करत अलीकडच्या काळात महिलांवरील /शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढ झाली असून, ग्रामीण भागातील महिला भीती पोटी व बदनामी पोटी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करतात. परंतु पोलीस स्टेशनला येण्यासाठी घाबरू नये, आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास पोलीस दल सक्षम असून, घाबरण्याचे काहीही कारण नाही. तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणे शक्य नसेल तर तुम्ही आपली तक्रार पेटीमध्ये टाकू शकता. आपल्या तक्रारी ची योग्य दखल घेतली जाईल असे प्रतिपादन व्यक्त केले. तसेच महिला व बालकांचे अपहरण, लैंगिक गुन्हे, बालकांच्या वरील अत्याचार, ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार यासारख्या विषयावर सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले.

        पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, मा.श्री अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री संकेत देवळेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दक्षता समितीची बैठक व "महिला तक्रार पेटी" अनावरन कार्यक्रमाचे आयोजन केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, हवा. सुशील रामटेके, मपोहवा पुनम हरिणखेडे, मपोशि निशा बोंद्रे, पोशि .कृपान डोंगरवार व सर्व अंमलदार पोलीस स्टेशन केशोरी यांनी  केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट