उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनात ” जातीय सलोखा मेळावा” मौजा गंगाझरी येथे संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– मा. श्री निखील पिंगळे (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री नित्यानंद झा ( भा.पो.से) अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी तसेच जातीय सलोखा कायम रहावा म्हणून मौजा गंगाझरी येथे आज दिनांक 23/02/ 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनात जातीय सलोखा कार्यक्रम घेण्यात आला.
जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांनी विविध दाखले देवून “भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबाबत, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारण अधि. २०१५ या कायदयाची माहिती दिली, दोन समाजातील जातीय वाद व जातीय तीढा कसा प्रकारे सोडवावा, सोशल मिडीयावर प्रसारीत होणारे जातीय विषयावरील चुकीच्या पोस्ट प्रसारीत होवु नये म्हणुन काय काय उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन केले… तसेच आपले परिसरातील जनतेस जातीय सलोखा राखण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन जनजागृती केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्य श्रीमती अश्विनताई पटले, प. स.सदस्य अजाबराव रीनायत तसेच श्री पंकज अंबुले सरपंच दांडेगाव, श्री प्रमोद पटले सरपंच सेजगाव, श्री नेत्रपाल आंबेडारे, सरपंच मजितपुर, सोनु भाऊ घरडे, सरपंच गंगाझरी श्री नरेंद्र टेंभरे सरपंच डोंगरगाव, कन्हैयालाल जिंदाकुर, उपसरपंच सहेशपुर,हिरामण मसराम सरपंच धमनेवडा तसेच पोलीस पाटील यांनी सदर विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सहा.पोलीस निरीक्षक संजय कुमार सोने पो.स्टे. गंगाझरी यांनी केले सदर कार्यक्रमास गंगाझरी परिसरातील सर्व प्रर्वगाचे नागरीक, तसेच परीसराचे पोलीस पाटील , सरपंच, तंटा मुक्त समिती चे कार्यकर्ते व ईतर गावकरी उपस्थितीत होते. सदर कार्यक्रम पार पडण्यास पो.उप.नि.पराग उल्लेवार , पो.हवा लितेश गोस्वामी, हरीश कटरे, प्रशांत गौतम, किरण बागडे, यांनी चांगली कामगिरी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com