पालघर पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात मोकाट गुरांच्या गळ्यात रेडीयम लावलेले पट्टे बांधण्याची मोहीम सुरूच…

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :-गुरुवारी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळ पासून मनोर,पालघर, बोईसर,वाणगाव,सफाळे, मनोर, तारापूर, तलासरी,डहाणू, वाडा, कासा आणि मोखाडा येथे वाहतूक शाखेत कार्यरत साठ अंमलदरांनी मोहीम राबवली.वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना शोधून त्यांच्या गळ्यात रेडियम लावलेले पट्टे बांधण्यात आले.बाराशे पेक्षा अधिक मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे बांधण्यात आले.पट्ट्यांमुळे वाहनांच्या हेड लाईटचा प्रकाश परावर्तीत होऊन रात्रीच्या वेळी होणारे अपघात रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील रस्त्यांवर मोकाट गुरांची संख्या मोठी आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांना वाहने धडकून होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.मोकाट गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला दिल्या होत्या.पोलीस अधीक्षकांच्या सुचने नुसार वाहतूक शाखेचे प्रभारी सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनात मोकाट गुरांना रेडियम बेल्ट लावण्याची मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेत पालघर जिल्ह्यातील वाहतूक शाखेत कार्यरत सुमारे साठ वाहतूक पोलीस अंमलदारांनी भाग घेतला होता.उपक्रमात दरम्यान दीडशे मोकाट गुरांना रेडियमचे पट्टे बांधण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट