गोंदिया पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारू निर्मिती हॉटस्पॉट संत रविदास वॉर्ड, इंदिराटोली तीरोडा येथील ठिकाणांवर छापा कारवाई 13 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल नाश, हातभट्टी दारु निर्मिती अड्डे उध्वस्त, 10 जनाविरुध्द गुन्हे दाखल, स्था.गु. शा. पथक, पो. ठाणे तीरोडा, आबकारी विभाग, नगर परिषद प्रशासनची संयुक्त कारवाई.



या बाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें तिरोडा येथील संत रविदास वॉर्डातील इंदिरा टोली परिसरात मोठया प्रमाणात अवैधरीतीने मोहफुल हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे तसेच इंदिराटोली येथे एकत्रितरित्या अवैध दारु निर्मिती करणाऱ्याची वाढती संख्या व सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या बाबीमुळे होणारा त्रास यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यास अपाय कारक बाब, होणारा दुष्परिणाम यामुळे परिसरातील जनते च्या तक्रारीत झालेली वाढ तसेच अवैध दारू निर्मिती करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाद्वारे वारंवार धाड कारवाई करुन सुध्दा अवैध दारु निर्मिती करणाऱ्यामध्ये कोणताच बदल न होता त्याच्यात वाढती गुन्हेगारी वृत्त्ती व ते करत असलेल्या अवैध धांद्यावर अंकुश बसावा, त्यांच्यात परिवर्तन घडून अवैध दारु निर्मिती धंदे व्यवसायापासून परावृत्त व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग भंडारा- गोंदिया यांनी जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या सदर परिसरातील सर्व अवैध दारु निर्मिती धंद्यावर, कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, गोंदिया श्री. मनोहर अंशुळे, मुख्याधिकारी श्री. परीहार नगर परिषद प्रशासन तिरोडा, उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे स्थानीक गुन्हे शाखा, गोंदिया, पो.नि. देविदास कठाडे यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास वॉर्ड, इंदिरा टोली तिरोडा येथे अवैध रित्या मोहाफुलाची हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर आज दिनांक 07 जुलै/2023 रोजी सकाळी 08.30 वाजता धडक छापामार कारवाई करण्यात येवून अवैध दारु निर्मिती अड्डे उध्वस्त करून सडवा मोहाफुल रसायनाने भरलेल्या 350 ते 400 प्लास्टिक पोतड्या ज्यामध्ये प्रत्येकी अंदाजे 40 किलोप्रमाणे सडवा मोहफुल रसायन 13,360 किलो प्रती किलो 100 रुपये प्रमाणे एकूण किंमती 13,लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल मोठया प्रमाणात मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात येवुन दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत.
संयुक्तंरित्या केलेल्या कारवाईत पोलीसांनी 10 इसमाविरूद्ध धाड कारवाई केली असून पो. ठाणे तिरोडा येथे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अबकारी विभागाने धाड कारवाई संदर्भात वेगळ्या कारवाया केलेल्या आहेत.
या कार्यवाहीत दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करणारे आरोपी नामे --
1) कलीम गफुर खा पठाण वय 36 वर्षे
2) तौशिफ सलीम खा पठाण वय 30 वर्षे
3) अमीन सफी शेख 28 पठाण वय 36 वर्षे
4) साबीर रहीम खा पठाण वय 57 वर्षे
5) अकील रहीम खा पठाण वय 58 वर्षे
6) दिलीप घनश्याम बरियेकर वय 35 वर्षे
7) संजय अशोक बरियेकर वय 45 वर्षे
8) महीला.. कनोजे
9) महीला.. खरोले
10) महीला.. बरियेकर
अशा एकूण 10 आरोपी विरूद्ध पो. ठाणे तिरोडा येथे कलम 65 (फ), 83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे उपस्थीत व मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, पोउपनी विघ्ने, पाटील, मपोउपनी सायकर,पोलीस अंमलदार कोडापे, हलमारे, तुरकर, बिसेन, शेख, केदार, रहांगडाले, मपोशी तोंडरे, पो. ठाणे तीरोडा येथील पोलीस अधिकारी सपोनि हनवते, पोउपनि पांढरे, पोलीस अंमलदार बावणे, कुळमते, श्रीरामे, रक्षे, दमाहे, खराबे, मपोशी तिरेले त्याचप्रमाणे आबकारी विभाग गोंदिया येथील अधिकारी, अंमलदार, नगर परिषद प्रशासन, व विद्युत विभाग अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com