लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अवैधरित्या गांजा वाहतूक करणार्या टेम्पोला पकडून २० किलो गांजासह ६,५०,०००/- रु.चा माल केला जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
लोणावळा :
सवीस्तर व्रुत्त असे की सहाय्यक पोलिस अधीक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी लोणावळा सत्यसाई कार्तिक यांचे सुचनांप्रमाणे संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनार्तगत विभागामध्ये दारुविक्री व वाहतूक, गुटखा वाहतूक, गुटखा विक्री, गांजा वाहतूक व विक्री
या अभियानातून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे
हद्दीमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
१) गांजाचे सेवन करणारे ८ लोकांचे विरुध्द कारवाई
२) १ अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई त्यातुंन जप्त माल – ६,८३, १२०/- रु चा गुटखा व वाहने.
३) दारुबंदी कायदयाखाली २७ गुन्हे त्यातुन जप्त माल – २,९४,०१०/- रुपये किंमतीची देशी, विदेशी व गावठी दारु.त्याचप्रमाणे दि. ११/०७/२०२३ रोजी ग्रे रंगाचा छोटा हत्ती मालवाहतूक टेम्पो नं. MH48 CB 1828 यामधून मुंबई ते पुणे रोडने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे गांजाची वाहतूक होत आहे. अशी पोलिस अंमलदार केतन तळपे यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच छापा कारवाईकरीता वरीष्ठांना कळवून
त्यांचे परवानगीने मौजे वरसोली ता. मावळ जि. पुणे गांवचे हद्दीमध्ये मुंबई ते पुणे हायवे रोडवर एम. एस. ई.बी. रेस्ट हाउसवे समोर सापळा रचून अत्यंत शिताफीने टेम्पो पकडला. त्यामध्ये इसम नामे
१) अशोक भूजंग चव्हाण वय ४३ वर्षे रा. धामणी खालापूर ता. खालापूर जि. रायगड व
२) शंकर भगवान साळुंखे वय ३० वर्षे रा. ठोंबरेवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांचेसह सदर टेम्पोची झडतीमधे २० किलो बिया बोंडासह हिरवट काळसर तपकीरी रंगाचा ओलसर गांजा हा अंमली पदार्थ असा एकुण ६,५०,०००/-रुपयाचा माल जप्त करण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला यश आले आहे.
सदरबाबत यातील आरोपींच्याविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम (क), २(बब), भा.दं.वि.का.क. ३४ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारचा माल सप्लाय करणारे लोकांची फारमोठी साखळी असण्याची शक्यता आहे असा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास चालू आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.
सदरची कारवाई ही अंकीत गोयल पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश गट्टे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे, पुणे ग्रामीण, सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक,लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण
पोलिस स्टेशन, सहा. पोलिस निरीक्षक देविदास करंडे, सहा. पोलिस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पो.
ना.गणेश होळकर, पोलीस अंमलदार केतन तळपे,
राहुल खैरे, प्रशांत तुरे यांनी कारवाई केली आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यानी दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com