पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत शेती उपयोगी- साहित्याचे वाटप सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार चे उपक्रम..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– गोंदिया जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार बाबासाहेब बोरसे, पो.स्टे. सालेकसा, यांचे मार्गदर्शनात सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, तसेच जिल्हा पोलीस चे अधिकारी अमलदार यांच्या सहकार्याने दिनांक- १७/१२/२०२३ रोज रविवारला ग्राम पंचायत पुराडा अंतर्गत मौजा- ईळुकचुआ या अति दुर्गम नक्षल गावी गोंदिया जिल्हा पोलीस विभागतर्फे शेती उपयोगी साहित्य वाटपाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….
सदर उपक्रमा दरम्यान गावक-यांची भेट घेवुन तेथील गोरगरीब गरजु आदिवासी परीवार जे शेतीवर अवलंबुन आहेत अश्या ४१ गोरगरीब परीवारास गोंदिया जिल्हा पोलीस, सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार तर्फे शेती उपयोगी शेती- साहित्य (फावडा) चे वाटप करण्यात आले…. सदर कार्यक्रमा दरम्यान गावातील १०० ते १५० आदिवासी बंधु भगीनी यांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला.
सदर उपक्रमा दरम्यान ग्रामभेट घेण्यात आली…आणि गावातील लोकांच्या समस्या जाणुन घेण्यात आल्यात…… गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडतांना पिण्याचे पाण्याची समस्या, ईळुकचुआ ते सितेगोटा (छ.ग.) पर्यंत रस्त्याचे बांधकाम ईळुकचुआ येथे नेटवर्क ची समस्या असुन मोबाईल कंपनी टॉवर ची मागणी, महामंडळ बस सेवा खंडीत असुन गावी बस सेवा चालु करावी. तसेच गावात वाचनालया ची सोय नाही. ई.समस्या पोलीस विभागास सांगुन शासनातर्फे त्यांचे लवकरात लवकर पाठपुरावा होईल अशी अपेक्षा गावक-यांनी व्यक्त केली.
तसेच पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत नागरीकांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व गावक-यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
साहित्य वाटप स्त्युत्य उपक्रम या विशेष कार्यक्रम दरम्यान जिल्हा पोलीस चे पोउपनि पडलवार, प्रभारी अधिकारी व सहकारी पोउपनि. भारत पांढरे, तसेच अमलदार पोहवा. कान्हेकर, नाकाडे, राऊत, नापोशि. गुट्टे, पोशि. वाढीवे, तुरकर, सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार अमलदार सह व SRPF बल गट धुळे, पोलीस अमलदार मिळुन मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शपनपर सुचना व सर्व प्रकारच्या SOP चे पालन करुन सदरचे कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यात आले..



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com