पोलीस दादालोरा खिडकी योजना ” एक हात मदतीचा ” अंतर्गत सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र पिपरीया येथे विविध स्पर्धा कार्यक्रमाचे तसेच सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र बिजेपार येथे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
⏩ मा. पोलीस अधिक्षक, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली व मा. श्री देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,देवरी, श्री.किशोर पर्वते, उपविपोअ, उपविभाग आमगाव व श्री. बाबासाहेब बोरसे, ठाणेदार पो.स्टे. सालेकसा यांचे सहयोगाने, पोलीस व अतिसंवेदशील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील जनता आणि पोलीस यांचे सबंध अधिक मजबुत व सुदृढ व्हावे व गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्रातील नविन युवक पिढी विदयार्थी व आदिवासी बांधवांमध्ये पोलीस दल व प्रशासना बाबत विश्वासाची व आपुलकीची भावना निमार्ण व्हावी या हेतुने गोंदिया पोलीस दादालोरा खिडकी योजना (एक हात मदतीचा) कार्यक्रमअर्तगत दि-२६-०९-२०२३ रोजी श्री. गणेश उत्सवानिमीत्त, विदयार्थ्यांच्या बौदधीक व शारीरीक क्षमतेचा विकास व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतुने विवीध स्पर्धा जसे की- रंगोली, भाषण, गायन व चेस स्पर्धा घेण्यात आल्यात, त्यात सशस्त्र दुरक्षेत्र- पिपरीया परिसरातील हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज,पिपरीया येथील जवळपास ३०० विदयार्थी उपस्थित होते…




दिनांक- २७-०९- २०२३ रोजी सदर स्पर्धेमध्ये प्रथम, दिव्तीय, त्रितीय आलेल्या विदयार्थ्यांना गोल्ड, सिल्वर व ब्राँझ असे मेडल व वाटप करण्यात आले. व त्यानंतर सर्वासाठी महाप्रसाद, जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती......
त्याचप्रमाणे मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, येथे दिनांक - २७/०९/२०२३ रोज बुधवारला पोउपनि पडलवार, प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, व सहकारी पोउपनि पांढरे सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार व SRPF पुणे बल गट ०१ चे पोउपनि जाधव सह जिल्हा पोलीस चे अमलदार व SRPF सर्व अमलदार यांच्या सयुक्त सहभागाने गणेश उत्सवाचे औचीत्य साधुन महाप्रसाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात ग्राम बिजेपार, शिवारीटाला, पांढरवाणी येथील ५०० ते ६०० स्त्री /पुरूष व सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील २२५ पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सदर गणेश उत्सव महाप्रसादाचे कार्यक्रम कम्युनीटी पोलीसींग अंतर्गत मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शपनपर सुचना व सर्व प्रकारच्या SOP चे पालन करुन साजरा करण्यात आला. सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील अधिकारी वर्ग सह जिल्हा पोलीस चे अमलदार व SRPF सर्व अमलदार तसेच सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील २२५ पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थी मिळुन सदरचे कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पडला.
त्याचप्रमाणे सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र पिपरीया येथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक सा. पोलीस उपनिरीक्षक सतोष माळगे, एस. आर.पि.एफ पुणे चे पोलीस उपनिरीक्षक एल. एस. तांदळे व पोहवा / येसुर, खोबागडे, मच्छिरके, भोवते व नापोशि बरईकर, माने, पोशि/मडावी, कोरे,कराड, चिकने, मौजे, उके, व.रा.रा.पो.बल गट पुणे गट क ०१ चे अमंलदार यांनी सर्वांनी योग्यप्रकारे सहकार्य करून कार्यक्रम योग्यरितीने पार पाडला.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com