पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत, एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत कार्यक्रमाचं आयोजन.., सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपारचे स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किशोर पर्वते, उपविभाग आमगाव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार बाबासाहेब बोरसे पो.स्टे. सालेकसा, यांचे सहकार्याने पोउपनि पडलवार, प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, व सहकारी पोउपनि भारत पांढरे, जिल्हा पोलीस अमलदार यांच्या अथक प्रयत्नांनी आणि सहकार्याने गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा “पोलीस दादालोरा खिडकी योजना” एक हात मदतीचा माध्यमातुन दिनांक- 08-11-2023 रोजी ग्राम पंचायत मुरपार अंतर्गत मौजा- पटवारी टोला येथे “एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत” कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते…..

आयोजित कार्यक्रमाचे अनुषंगाने पटवारीटोला येथील प्रत्येक आदिवासी माता- भगिनी महिलांकरिता सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार तर्फे दिवाळी भेट म्हणून साडी- चोळी व दिवाळी करीता फराळाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला गावातील सर्व आदिवासी बंधु- माता भगीनी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.. व या निमीत्त त्यांनी गावातील पिण्याचे पाण्याची समस्या पोलीस विभागास सांगुन शासनातर्फे त्यांचे लवकरात लवकर पाठपुरावा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली…… तसेच पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत नागरीकांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व गावक-यांच्या समस्या जाणुन घेण्यात आल्या…

सदरचे कार्यक्रम संपल्यानंतर ग्राम पंचायत मुरपार येथे सरपंच पोलीस पाटील ग्रापंचायत सदस्य व ईतर ग्रामस्थ यांची ग्रामभेट घेवुन त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या…

एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत या विशेष कार्यक्रम दरम्यान जिल्हा पोलीस चे पोहवा. कान्हेकर, नाकाडे, पोशि शहारे, टेंभुर्णीकर, वाढीवे, सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील SRPF बल गट धुळे चे अधिकारी पोलीस अमलदार मिळुन मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शपनपर सुचना व सर्व प्रकारच्या SOP चे पालन करुन कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट