पालघर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या अंतर्गत पुरुष व महिला पोलीस पदांची भरती प्रशिक्षण चालु…

प्रतिनिधी :- मंगेश उईके
पालघर:-२०२२ / २०२३ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस भरती प्रशिक्षण
पालघर जिल्हा दि.१९/०६/२०२४ पासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. मैदानी चाचणीकरीता पुरुष उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे व गोळाफेक असे प्रकार तर महिला उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे व गोळाफेक असे प्रकार घेण्यात येत आहेत.




सदर पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी, शारीरिक तपासणी व गोळाफेक है जिल्हा क्रिडा संकुल, दांडेकर कॉलेज जवळ, खारेकुरण रोड, पालघर ता. जि. पालघर येथील मैदानावर चालू आहे.
तसेच १६००/८०० मीटर व १०० मीटर धावणे हे प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालय समोर चालु आहे.तसेच पोलीस भरती मैदानी चाचणी करता येणाऱ्या महिला उमेदवार यांची राहण्याची व्यवस्था अंबा माता मंदिर पाच बत्ती जवळ करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवार यांची राहण्याची व्यवस्था लायन्स क्लब हॉल कचरी रोड पालघर येथे करण्यात आली आहे. व त्यांना राहणाऱ्या ठिकाणाहून भरतीच्या ठिकानी नेण्यासाठी व आणण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण भरती ही अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून केली जात आहे. आर. एफ. आय. डी. आणि संपूर्ण डिजिटलाईट स्वरूपाची साधनं हाईट / चेस्ट मेजरमेंट ची सर्व साधनं हे डिजिटलाईट आहेत त्यामुळे या भरती मध्ये पारदर्शकता राहण्यासाठी आणि कुठलेही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्वताही उपाय करण्यात आले आहेत. तसेच भरतीसाठी आलेल्या उमेदवाराला कुठल्याही स्वरूपाचे अमिष दाखवू नये किंवा मिस गाईड करू नये यासाठी अँटी करप्शन एस आय डी आणि गोपनीय शाखा असे हे सर्व वेग वेगळे पथक काम करत आहेत कुठलाही गैर प्रकार होऊ नये यासाठी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत असे पालघरजिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सूचना दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com