MPDA कायदा अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशन कडुन आरोपी निलेश कोळीवर कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

जळगांव :

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे निलेश भिला कोळी वय-30 वर्षे रा.उत्राण गु.ह. ता. एरंडोल जि. जळगांव याच्या विरूध्द कासोदा पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी मारहाण करून मालमत्तेचे नुकसान, साथीदारांसह गौण खनिज (वाळु)चोरी, विनयभंग व इतर गुन्हे दाखल होते. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येवुन देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता.

नमुद इसमाने वाळु चोरीचे तसेच शरीराविरूध्द गुन्हे केलेले होते त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याने मा. न्यायालयातुन जामीनावर सुटल्यावर सुध्दा पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले होते त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून गावांतील लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती. दिवसें-दिवस वेगवेगळ्या त-हेने गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांसाठी तो उपद्रवी बनला होता.

त्यामुळे त्याचे विरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कालाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन-1981 नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञेत मोडत असल्याने त्याचे विरूध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार मा.पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांचे आदेशानुसार मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे निलेश भिला कोळी याचे विरूध्द सपोनि निलेश राजपुत व पो.हे.कॉ.3079 नरेंद्र गजरे यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधिक्षक यांचेकडेस पाठविला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून मा. पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांनी मा. जिल्हाधिकारी सो, जळगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता. त्यानुसार दिनांक-07/01/2025 रोजी मा.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांनी MPDA कायद्याअंतर्गत निलेश भिला कोळी यांस स्थानबध्द करण्याचे आदेश काढले त्याअनुषंगाने दिनांक-08/01/2025 रोजी त्यास ताब्यात घेवुन ठाणे मध्यवर्ती कारगृह, जिल्हा-ठाणे येथे रवाना करण्यात आले आहे.

या कारवाईत सपोनि निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक दत्तु खुळे, पो.हे.कॉ. नरेंद्र गजरे, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, पो.हे.कॉ. श्रीकांत गायकवाड, पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.ना. धर्मेंद्र ठाकुर, पो.ना. अकील मुजावर, पो.ना.किरण गाडीलोहार, पो.कॉ. अमोल गवळी, पो.कॉ. लहु हटकर, पो. कॉ. कुणाल देवरे अशांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट